Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तुमच्यात काही मतभेद असतील तर सांगा, मी मिटवतो ! शाहू महाराजांची कोपरखळी, शिवसेना नेत्यांनाही हसू आवरेना !! हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेकडून सरकारकडे सादर ! कोल्हापूरसाठी लवकरच तीन आनंदाच्या बातम्या !!ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्षभरात दहा हजार ई-रिक्षांचे वितरण-मंत्री आदिती तटकरे महावितरण घेणार सर्व जिल्हाभर ग्राहक मेळावेशिक्षणमहर्षी बापूजी साळुंखेंच्या संकल्पनेतील शिक्षकच चांगला समाज घडवू शकतो-मंत्री पंकज भोयरसफाई कर्मचाऱ्यांसाठी अवकारिका सिनेमाचे मोफत प्रदर्शनपन्हाळा तालुक्यातील प्राथमिक शाळेची भिंत कोसळली ! जिल्ह्यातील १०० शाळांच्या धोकादायक इमारतींचे सर्व्हे !!केएमटीच्या १५६ रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याचा निर्णय- राजेश क्षीरसागरभाजपतर्फे कोल्हापूर महानगरच्या नऊ मंडल कार्यकारिणींची घोषणा

जाहिरात

 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन

schedule08 Aug 25 person by visibility 396 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन:  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी  विविध मागण्यांकरीता  शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आल. राज्य सरकारने मागण्या मान्य न केलास 18 ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रापंचायत कर्मचाऱ्यांनी दिला. तर या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दिला असून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. मंत्रालय पातळीवर संघटनेची बैठक लावण्याबाबत, आपणं पाठपुरावा करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावे त्याचबरोबर राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे 3 हजार 410 रूपये राहणीमान भत्ता लागू करून मागील फरकाची रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी. यासह इतर विविध मागण्याकरिता कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्यावतीने  आंदोलन करण्यात आले.राज्यभरात सुरू असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही कळवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सम्राट मोरे यांनी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वेळोवेळी शासनाचे याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र अद्यापही या मागण्या प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितले.  शिवसेना  पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड रघुनाथ कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. बबन पाटील, रवी कांबळे अशोक पाटील,.परशराम जाधव, अशोक गेंगे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कर्मचारी मोठ्या संख्येन आंदोलनात सहभागी होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes