भाजपतर्फे कोल्हापूर महानगरच्या नऊ मंडल कार्यकारिणींची घोषणा
schedule07 Aug 25 person by visibility 59 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू झाली आहे. भाजपतर्फे कोल्हापूर महानगरच्या नऊ मंडलची कार्यकारिणी घोषित केली. राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते संबंधितांना नियुक्ती पत्रे दिली. यामध्ये कसबा बावडा भाजपा मंडल अध्यक्षपदी धीरज पाटील, शाहूपुरी - सचिन कुलकर्णी, लक्ष्मीपुरी - विशाल शिराळकर, राजारामपुरी उत्तर - रविकिरण गवळी, राजारामपुरी दक्षिण - राज गणेश पोळ, मंगळवार पेठ दक्षिण - प्रीतम यादव, शिवाजी पेठ उत्तर - कोमल देसाई, शिवाजी पेठ दक्षिण - विनय खोपडे, उत्तरेश्वर सुनील पाटील यांचा समावेश आहे. याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री भोयर म्हणाले, ‘राज्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहोचवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. महापालिका जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणे यासाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी आत्तापासूनच पक्ष विस्तार आणि प्रचारासाठी कटिबद्ध राहावे.’ भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा पश्चिम ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नाथजी पाटील, राहुल चिकोड़े, डॉ राजवर्धन, गायत्री राऊत, रूपाराणी निकम, गिरीष साळोखे उपस्थित होते.