मिरजकर तिकटी हुतात्मा स्मारक येथे ध्वजारोहण
schedule15 Aug 25 person by visibility 37 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : -भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्यावतीने मिरजकर तिकटी हुतात्म्मा स्मारक येथे ध्वजारोहण करण्यात आले. माजी सैनिक हरिबा पाटील यांच्या हस्ते व मेजर एस सुशिंद्रन यांच्या प्रमुख उपस्थित ध्वजवंदन झाले. नागेश देवरुख यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या राष्ट्रीय कार्यक्रमास अब्दुल मुल्ला, पद्माकर घाडगे, सुनील तवंदकर, रमेश मोरे, नामदेव माळी, केशव चेंडके, विनायक तहसीलदार, राजेश गायकवाड, अशोक पोवार, सचिन साबळे, उदय वास्कर उपस्थित होते.