Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रनगरीसाठी ४४ कोटीचा निधी, पोस्ट प्रॉडक्शनची सुविधा होणार ! अमल महाडिकांचा पाठपुरावा !!बिल्डर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर ! सुरेश गुळवणी, शंकर पाटील, संजय चव्हाण, उज्ज्वल नागेशकर, अशोक रोकडेंचा समावेश पर्यावरणदिनी क्रिडाई संघटनतर्फे शंभर रोपांची लागवडजिल्हा परिषदेत स्वराज्यगुढी, शिवराज्याभिषेकदिनी शिवरायांच्या कर्तुत्वाला उजाळामहापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम जाहीरगोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजराकोल्हापुरात सोमवारी -मंगळवारी पाणी पुरवठा बंदमहावितरणच्या वीज प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा सोमवारी ऊर्जा दरबारशारंगधर देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! मेळावा घेऊन कोल्हापुरात होणार पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून 5000 कार्यकर्ते जाणार

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत स्वराज्यगुढी, शिवराज्याभिषेकदिनी शिवरायांच्या कर्तुत्वाला उजाळा

schedule07 Jun 25 person by visibility 49 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच ०६ जून १६७४, शिवराज्याभिषेक दिन. यादिनाचे औचित्य साधून शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी जिल्हा परिषद आवारातील कागलकर वाड्याच्या प्रांगणात उभारण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वराज्य गुढीची विधीवत पूजा करून त्याची उभारणी सनई, पोवाड्याच्या जयघोषात करण्यात आली. कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील विविध प्रसंग नृत्य व नाटिकेतून सादर करून शिवराज्याभिषेक दिनी त्यांच्या कर्तुत्वाला उजाळा देण्यात आला.  गुढी उभारणीनंतर जिल्हा परिषद कला मंचाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत गायले गेले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शाहीर रंगराव पाटील यांनी अफजलखानाचा वध, पन्हाळगड वेढा, आग्र्यातून सुटका, राज्याभिषेक समारंभ इत्यादी प्रसंगांचे जिवंत देखाव्यातून सादरीकरण केले. कागलकर वाड्याच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमासाठी आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे,  महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देषाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव उपस्थित होते. बाबासाहेब माळवे यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes