Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रनगरीसाठी ४४ कोटीचा निधी, पोस्ट प्रॉडक्शनची सुविधा होणार ! अमल महाडिकांचा पाठपुरावा !!बिल्डर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर ! सुरेश गुळवणी, शंकर पाटील, संजय चव्हाण, उज्ज्वल नागेशकर, अशोक रोकडेंचा समावेश पर्यावरणदिनी क्रिडाई संघटनतर्फे शंभर रोपांची लागवडजिल्हा परिषदेत स्वराज्यगुढी, शिवराज्याभिषेकदिनी शिवरायांच्या कर्तुत्वाला उजाळामहापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम जाहीरगोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजराकोल्हापुरात सोमवारी -मंगळवारी पाणी पुरवठा बंदमहावितरणच्या वीज प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा सोमवारी ऊर्जा दरबारशारंगधर देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! मेळावा घेऊन कोल्हापुरात होणार पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून 5000 कार्यकर्ते जाणार

जाहिरात

 

बिल्डर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर ! सुरेश गुळवणी, शंकर पाटील, संजय चव्हाण, उज्ज्वल नागेशकर, अशोक रोकडेंचा समावेश

schedule07 Jun 25 person by visibility 410 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या नव्याने निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ,  कोल्हापुरातील जेष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवन गौरव पुरस्कार आणि उत्कृष्ठ वास्तू निर्मिती पुरस्कार प्रदान समारंभ  रविवारी (८ जून २०२५ ) सायंकाळी पाच वाजता रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे होत आहे.

समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहणार आहेत.  कार्यक्रमास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष  अविनाश पाटील, स्टेट चेअरमन  जगनाथ जाधव व क्रीडाई उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य  विद्यानंद बेडेकर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे नूतन चेअरमन  विजय कोंडेकर, व्हाइस चेअरमन  अमोल कुलकर्णी, जी,सी,मेंबर प्रताप बापू कोंडेकर, माजी चेअरमन  राजीव लिंग्रस, मदन भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         या नव्या पदाधिकारी व कार्यकारणीच्या पदग्रहन समारंभाबरोबरच बांधकाम क्षेत्रात आपल्या अतुलनीय कर्तुत्वाने नावलौकिक कमवलेले व कोल्हापूर शहराच्या जडणघडणीचे पहिले शाहूकालीन आर्कीटेक्ट कै.  रामराव नागेशकर ज्यांनी राधानगरी धरण, शालिनी पॅलेस, संपूर्ण राजारामपुरीची रचना व बऱ्याच महत्वाच्या वास्तूंचे रचनाकार म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्राशी निघडीत व आधुनिक बांधकाम साहित्य चे शिल्पकार  सुरेश गुळवणी (खतेन्द्र वितरक) यांना जीवनगौरव पुरस्कार त्याचबरोबर उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार बांधकाम व्यावसायिक शंकर पाटील व  संजय चव्हाण यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

हॉटेल व्यावसायिक उज्वल नागेशकर व अशोक रोकडे (व्हाईट आर्मी)  यांना “जीवन-दूत” हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटर चे नूतन चेअरमन विजय कोंडेकर व त्यांच्या कार्यकारणी पदग्रहण समारंभ पार पडणार आहे. यंदाचे पुरस्काराचे दहा वर्ष आहे. मानपत्र, मानचिन्ह, शाल ,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे
     

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes