Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रनगरीसाठी ४४ कोटीचा निधी, पोस्ट प्रॉडक्शनची सुविधा होणार ! अमल महाडिकांचा पाठपुरावा !!बिल्डर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर ! सुरेश गुळवणी, शंकर पाटील, संजय चव्हाण, उज्ज्वल नागेशकर, अशोक रोकडेंचा समावेश पर्यावरणदिनी क्रिडाई संघटनतर्फे शंभर रोपांची लागवडजिल्हा परिषदेत स्वराज्यगुढी, शिवराज्याभिषेकदिनी शिवरायांच्या कर्तुत्वाला उजाळामहापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम जाहीरगोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजराकोल्हापुरात सोमवारी -मंगळवारी पाणी पुरवठा बंदमहावितरणच्या वीज प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा सोमवारी ऊर्जा दरबारशारंगधर देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! मेळावा घेऊन कोल्हापुरात होणार पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून 5000 कार्यकर्ते जाणार

जाहिरात

 

चित्रनगरीसाठी ४४ कोटीचा निधी, पोस्ट प्रॉडक्शनची सुविधा होणार ! अमल महाडिकांचा पाठपुरावा !!

schedule07 Jun 25 person by visibility 46 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या चित्रनगरीसाठी तब्बल ४४ कोटी ३७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  या निधीतून चित्रनगरी परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. आमदार अमल महाडिक यांनी या निधीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता.

कोल्हापुरात कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अमल महाडिक यांनी चित्रनगरीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी आणण्याची घोषणा केली होती. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे चित्रनगरीला निधी देण्या संदर्भात पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून प्राप्त निधीपैकी २ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी चित्रनगरी परिसराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी देण्यात आला आहे.  चित्रनगरीचे मुख्य प्रवेशद्वार उभारणे, सौर ऊर्जेद्वारे चित्रनगरी परिसराला वीज पुरवठा करण्यासाठी ३०० केव्ही क्षमतेचे सोलर पॅनल उभारणे, चित्रनगरी मधील लोकेशनचा भाग असलेल्या मंदिरासाठी घाट बांधणे तसेच जलाशयाचा विकास करणे, स्टुडिओ क्रमांक चारचे बांधकाम कामांसाठी १४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी आहे.
कोल्हापूर चित्रनगरीमध्ये चित्रीकरणाबरोबरच पोस्ट प्रोडक्शन युनिटच्या बांधकामासाठी ११ कोटी १६ लाख रुपये आणि पोस्ट प्रोडक्शन युनिट मधील अद्ययावत यंत्रसामग्री आणि अन्य सुविधांसाठी ९ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चित्रपटांसाठी स्क्रीनिंग थिएटर चित्रनगरी परिसरात उभारण्यात येणार आहे. या स्क्रीनिंग थिएटरच्या बांधकामासाठी ६ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी आहे.

…………..

“ शाश्वत विकासाचे धोरण घेऊन कार्यरत असलेल्या महायुती सरकारचे कोल्हापूर चित्रनगरीला भरघोस निधी दिल्याबद्दल आभार. कोल्हापूरच्या चित्रपट सृष्टीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल आहे. भविष्यात आणखी निधी खेचून आणून कोल्हापूरची चित्रनगरी परिपूर्ण करण्याचा संकल्प आहे. कोल्हापूरच्या मातीतील कलाकार, तंत्रज्ञ यांच्या क्षमतेला वाव आणि एकूणच मराठी चित्रपटसृष्टीचे माहेर घर ही कोल्हापूरची ओळख आता अधिक ठळक बनेल.”
- अमल महाडिक, आमदार कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes