Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम जाहीरगोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजराकोल्हापुरात सोमवारी -मंगळवारी पाणी पुरवठा बंदमहावितरणच्या वीज प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा सोमवारी ऊर्जा दरबारशारंगधर देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! मेळावा घेऊन कोल्हापुरात होणार पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून 5000 कार्यकर्ते जाणारचित्रकाराची शिवभक्ती, चित्रातून उलगडला शिवछत्रपतींचा इतिहास !जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रंथपाल - शारीरिक शिक्षण संचालकपदाच्या भरतीसाठी प्राचार्य असोसिशनने घेतली मंत्र्यांची भेटबीबीए, बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार- मंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

 

शारंगधर देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! मेळावा घेऊन कोल्हापुरात होणार पक्षप्रवेश

schedule06 Jun 25 person by visibility 363 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. देशमुख यांनी शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत  शुक्रवारी भेट घेतली. येत्या पंधरा दिवसांमध्ये कोल्हापुरात जंगी मेळावा घेऊन देशमुख हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. देशमुख यांचा शिवसेनेतील प्रवेश हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना धक्का मानला जातो.
 विधानसभा निवडणुकीपासून शारंगधर देशमुख हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते. गेले काही दिवस ते शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती शिवसेनेच्या नेत्या सोबत त्यांच्या बैठकही झाल्या होत्या. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांच्यासह देशमुख यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अशपाक आजरेकर व अभिजीत खतकर हे देखील होते. यावेळी झालेल्या चर्चेत कोल्हापुरात शिवसेनेचे संघटन वाढविण्यासोबतच आगामी निवडणुकीत शिवसेनेला जास्तीत जास्त यश मिळवून देणे या बाबीवर  फोकस ठेवण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माजी नगरसेवक देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कोल्हापुरात जंगी मेळावा घेऊन देशमुख हे शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात मेळावा होणार आहे.
 विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये धुसफूस झाली. तेव्हापासून काँग्रेसमध्ये काही नगरसेवक  अस्वस्थ होते. विधानसभा निवडणूक झाल्यापासून देशमुख हे काँग्रेस पासून अलिप्त होते. तीन वेळा महापालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसचे गटनेते स्थायी समितीचे माजी सभापती या जबाबदारी त्यांनी पेलल्या आहेत.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतील कारभार पाहत होते. दरम्यान विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून मतभेद झाले. आणि शारंगधर देशमुख हे सतेज पाटील यांच्यापासून दूर गेले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes