पाचगावच्या उपसरपंचपदी दीपाली प्रकाश गाडगीळ
schedule15 Aug 25 person by visibility 107 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपाली प्रकाश गाडगीळ यांची निवड झाली. सरपंच प्रियांका संग्राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अजित राणे होते. उपसरपंचपदासाठी गाडगीळ यांचा एकमेव अर्ज होता. यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने घोषित केले. बैठकीला ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, अतुल गवळी, संग्राम पोवाळकर, सचिन पाटील, विलास पाटील, अभिजीत पौंडकर, अमित कदम, अश्विनी चिले, रोमा नलवडे, पौर्णिमा कांबळे उपस्थित होते. कोअर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी ढेरे आदींनी अभिनंदन केल. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.