भाजपाचा वचननामा, कोल्हापुरात पाइपलाइनद्वारे घरोघरी गॅसपुरवठा, केएमटीसाठी इलेक्ट्रिक बसेस
schedule08 Apr 22 person by visibility 1000 categoryराजकीय
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरवासियासाठी वचननामा जाहीर केला. पाईपलाईन द्वारे घरोघरी गॅस पुरवठा, शहरवासीयांच्या करता इलेक्ट्रिक बसेस, तरुणाईतील टॅलेंटसाठी स्वतंत्रपणे यंग कम्युनिटी, शेतमालाला उठाव देण्यासाठी कार्गो हब यासारख्या यासारख्या नाविन्यपूर्ण नावीन्यपूर्ण संकल्पनांची घोषणा केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, महिला आघाडीच्या चित्रा वाघ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये, उमेदवार सत्यजित कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शोमिका महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये वचननामा चे प्रकाशन झाले. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीच्या कारभाराला कंटाळलेल्या लोकांनी भाजपला निवडून देण्याचे मनापासून ठरविले आहे. यामुळे या निवडणुकीत सत्यजित कदम विजय होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. केंद्राच्या विविध योजना कोल्हापुरात आणून शहराचा विकास करू अशी ग्वाही पाटील यांनी दिली. विमानतळ विस्तारीकरण रेल्वेच्या सुविधा यासह अन्य आणि विकास कामासाठी पाठपुरावा करण्याकरता सत्यजित कदम यांच्यासाठी दिल्लीमध्ये स्वतंत्र पीए असेल. कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष नियोजनबद्धरीत्या कामकाज करेल. शहरातील पार्किंग व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, यासाठी विविध योजना आखल्या जातील. जिल्ह्यातील शेती मालाला उठाव देण्यासाठी कार्गो हब ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण, नाईट वेंडिंग सुविधा यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबरोबर थेट संपर्क ठेवला जाईल. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे येत्या काही दिवसात कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात कोल्हापूर विमानतळ संबंधी रखडलेल्या प्रश्नांना चालना मिळेल. सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचा कायापालट करण्याचा मानस आहे. केंद्राच्या विविध योजना आणि त्याला लोकसहभागाची जोड याद्वारे शहर सुंदर करु. सत्तेच्या पलीकडे जाऊन शहर विकासासाठी शहर सौंदयीऺकरण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवू. ब
सत्यजित कदम आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शहरवासीयांना अधिकाधिक लाभ मिळवून देतील. सध्या इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी चौकाचौकात चार्जिंग स्टेशन उभारणी प्रस्तावित आहे. कोल्हापुरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरळीत व केएमटी प्रवासीभिमुख करण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे. यासाठ केंद्र सरकारच्या माध्यमातून पुण्याच्या धर्तीवर कोल्हापूरला इलेक्ट्रिक बस मिळाव्यात याकरिता पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ. केएमटी सक्षम असावी, तोट्यातून बाहेर पडावी यासाठी इलेक्ट्रिक बसेस मिळतात म्हणून पंतप्रधानांच्या माध्यमातून शहरवासीयांना ही सुविधा देण्याचा मानस आहे. कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील आहे. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वार्थी राजकारणासाठी हद्दवाढ रोखली आणि प्राधिकरणाची वाट लावलीअसा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. पुण्यात 50 गावे हद्दवाढीत समाविष्ट होतात तशी हिम्मत कोल्हापुरात दाखवणार का असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला. पालकमंत्र्यांनी हददवाढीत समाविष्ट करावयाची पाच गावांची नावे जाहीर करावीत. त्यांच्यामध्ये कळंबा, पाचगाव गावांना हात लावायची हिंमत आहे का असा प्रश्नही त्यांनी केला. राजर्षी शाहू जन्मस्थळ विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तेरा कोटी रुपये निधी दिला होता. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी माहिती घेऊन बोलावे असा टोमणा मारला. माझ्यावर टीका करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये कोल्हे राहिले होते अशी कोपरखळी त्यांनी मारली.