Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इंडिया आघाडीतर्फे रविवारी दसरा चौक ते माणगावपर्यंत सन्मान बाइक रॅलीजिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे रेकॉर्ड तयार होणार, शिक्षण विभागातर्फे मिशन विद्याभूमीउपक्रम !पंचगंगा नदी मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या ! पंकजा मुंडेंचा सवालशिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयाची हॅटिट्रकप्रभात-रॉयल थिएटर बनले पीआर सिनेप्लेक्स, एक पडदा चित्रपटगृहाला मल्टिप्लेक्सचा लूककोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट-क्षीरसागरांची क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाहीआयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर दिसणार  लंडन ब्रिज- युरोपियन स्ट्रीट डॉ. जे. के. पवार यांच्या साहित्यकृतीस राज्य साहित्य विशेष पुरस्कार प्रदानभारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्धापनदिन उत्साहात साजरातपोवन मैदान येथे शुक्रवारपासून सतेज कृषी-पशुपक्षी प्रदर्शन

जाहिरात

 

प्रभात-रॉयल थिएटर बनले पीआर सिनेप्लेक्स, एक पडदा चित्रपटगृहाला मल्टिप्लेक्सचा लूक

schedule26 Dec 24 person by visibility 91 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीतील थिएटर म्हणजे रॉयल आणिप प्रभात. गेली कित्येक दशके प्रेक्षकांचे मनोरंजनाचे प्रमुख केंद्र असलेले ह दोन्ही थिएटर आता नव्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या सेवेत आहेत. शिवाय ह दोन्ही थिएटर आता पीआर सिनेप्लेक्स असे केले आहे.

‘प्रेक्षकांची अभिरुची जपणे हाच ध्यास समोर ठेवून चित्रपटगृहांचे नूतनीकरण केले. १९३२ मध्ये उदघाटन झालेले रॉयल आणि १९४२ पासून प्रेक्षकांच्या सेवेत असलेले प्रभात सिनेमागृह या एकपडदा चित्रपटगृहांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कित्येक चित्रपटांनी येथे रौप्यमहोत्सव अनुभवला. प्रेक्षकांसाठी वेळोवेळी सुधारण करून त्याला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला.’ अशी माहिती पीआर सिनेप्लेक्सचे नारायण रुईकर यांनी आज दिली.

हे दोन्ही थिएटर शुक्रवारपासून (२७ डिसेंबर) पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये मल्टिप्लेक्सच्या खुर्च्या, स्क्रीन, साऊंड यामध्ये बदल. मायबाप रसिक प्रेक्षकांचे कापरेटने स्वागत. एक्झिक्युटिव्ह वॉशरूम, सर्व सुविधांयुक्त असलेले कँटिन, अशा सुविधांनी सुसज्ज आहेत. प्रभात-रॉयल या ऐवजी पीआर सिनेप्लेक्स या नावाने ही चित्रपटगृहे यापुढे ओळखली जातील. दोन्ही चित्रपटगृहांना प्रेक्षकांना प्रभातच्या बाजूने प्रवेश आहे. पुष्पा आणि बेबी जॉन, असे दोन चित्रपट आज प्रदर्शित. इतक्या साऱ्या सुविधा देऊनही तुलनेने तिकीट दर सामान्य प्रेक्षकाला परवडतील असे व्यवस्थापनने म्हटले आहे.

नारायण रुईकर म्हणाले, प्रेक्षकांची अभिरुची जपण्यासाठी नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानासह स्वच्छता, टापटीप या गोष्टींना प्राधान्य दिले. त्यामुळे प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांच्या पाठबळावरच पुन्हा एकदा  थिएटरचे नूतनीकरण केले आहे.  हा बदल प्रेक्षक पसंत करतील, असा आम्हाला विश्वास आहे. प्राईम आणि क्लासिक असे दोनच वर्ग ठेवले आहेत. एकपडदा चित्रपटगृहाला आम्ही मल्टिप्लेक्सचा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes