कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट-क्षीरसागरांची क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाही
schedule26 Dec 24 person by visibility 50 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचे प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याचे प्रतिपादन नूतन आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
कोल्हापूर क्रीडाईतर्फे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांचा रेसिडेन्सी क्लब येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. क्रीडाईचे अध्यक्ष कृष्णात खोत, माजी अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सेक्रेटरी संदीप मिरजकर यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी क्षीरसागर म्हणाले, आगामी काळात इमारतींच्या उंचीचा विषयही प्राधान्यक्रमावर घेवून सोडविला जाणार आहे. क्रीडाईची प्रमुख मागणी असलेले आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरसाठी रु.५० कोटींचा निधी वर्ग झाला असून, त्याचेही काम लवकरच सुरु होईल. ३२०० कोटींचा पूरनियंत्रणाचा प्रकल्प सरकारने हाती घेतला असून येत्या एप्रिल महिन्यापूर्वीच त्यातून होणाऱ्या कामास सुरवात केली जाणार आहे. पूरबाधित क्षेत्रातील ब्ल्यू लाईन मधील टीडीआरचा प्रश्न सोडवू. राजर्षी शाहू मिल सुधारणा, खंडपीठ, आयटी पार्क, टेक्नॉलॉजी पार्क, फौंड्री हब, रिंग रोड, परीख पूल हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक बाब आहे त्यामुळे सर्वांना विश्वासात घेवून शहराची हद्दवाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहू,”