Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इंडिया आघाडीतर्फे रविवारी दसरा चौक ते माणगावपर्यंत सन्मान बाइक रॅलीजिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे रेकॉर्ड तयार होणार, शिक्षण विभागातर्फे मिशन विद्याभूमीउपक्रम !पंचगंगा नदी मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या ! पंकजा मुंडेंचा सवालशिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयाची हॅटिट्रकप्रभात-रॉयल थिएटर बनले पीआर सिनेप्लेक्स, एक पडदा चित्रपटगृहाला मल्टिप्लेक्सचा लूककोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट-क्षीरसागरांची क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाहीआयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर दिसणार  लंडन ब्रिज- युरोपियन स्ट्रीट डॉ. जे. के. पवार यांच्या साहित्यकृतीस राज्य साहित्य विशेष पुरस्कार प्रदानभारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्धापनदिन उत्साहात साजरातपोवन मैदान येथे शुक्रवारपासून सतेज कृषी-पशुपक्षी प्रदर्शन

जाहिरात

 

डॉ. जे. के. पवार यांच्या साहित्यकृतीस राज्य साहित्य विशेष पुरस्कार प्रदान

schedule26 Dec 24 person by visibility 36 categoryजिल्हा परिषद

 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे दिला जाणारा "छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार २०२४" शाहू कार्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित 'राजर्षी शाहूंची वाड्मयीन स्मारके' या बृहद्ग्रंथाला प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे वितरण प्रमुख पाहुणे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, दहा हजार रुपये रोख रक्कम, शाल व पुष्पगुच्छ असे आहे. पुरस्काराचे वितरण अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील राजर्षी शाहू सभागृहामध्ये झाले.
 याप्रसंगी बोलताना प्राचार्य पवार म्हणाले, ‘आजचे वैचारिक प्रदूषण थांबविण्यासाठी लेखकांना समर्थपणे भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यांच्या लेखणीतून फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार पुन्हा रुजवावे लागणार आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षामध्ये या ग्रंथास तिसरा साहित्य पुरस्कार प्राप्त झाल्याने विशेष आनंद आहे.’ ॲड. विश्‍वासराव आठरे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रा. गणेश भगत यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes