आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर दिसणार लंडन ब्रिज- युरोपियन स्ट्रीट
schedule26 Dec 24 person by visibility 21 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी.जे.अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरातील आर्यविन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर लंडन ब्रिज,युरोपियन स्ट्रीट एक्झिबीशन भरविले आहे. ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे चित्रांच्या माध्यमातून साकारले आहे. येथील लंडन ब्रीज वरून जाण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे अशी माहिती व्यवस्थापक जयप्रकाश आणि रवींद्रनाथ, रवी नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शुक्रवारी, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता या नगरीचे उद्घाटन होणार आहे.याठिकाणी उभा करण्यात आलेला लंडन ब्रीज हा १८० फुटाचा आहे. उंची ४५ फूट आहे तर रुंदी १५ फूट आहे. चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करून युरोप सिटी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
लहान मुलांसाठी मनोरंजन नगरी आहे. शिवाय विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल आहेत. पुस्तके उपलब्ध आहेत. स्वादिष्ट खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. कोल्हापूरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. २७ डिसेंबरपासून दोन महिने ही मनोरंजनाची नगरी प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. प्रवेशासाठी तिकीट शुल्क आहे.