Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या जनसुराज्य शक्ती पक्ष - आरपीआयकडे असतील : समित कदमशिक्षकांच्या पगाराला विलंब, प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचा आंदोलनाचा इशारामहापालिका शिवसेना निवडणूक समन्वयकपदी रत्नेश शिरोळकरशहीद महाविद्यालयात ग्लोबल कोल्हापुरी संवाद : अमेरिकेत कार्यरत युवा आयटी तंत्रज्ञांची अनोखी मैफलजिल्हा परिषदेची निवडणूक दोन दिवसात जाहीर ?चांगभलं…जनसुराज्य लढविणार २९ जागा  ! अक्षय जरग, प्रसाद चव्हाण, सुभाष रामुगडेंची बंडखोरी! !उमा बनछोंडेनी दाखल केला उमेदवारी अर्जप्रभाग क्रमांक चारमधून योगिता प्रवीण कोडोलीकरांनी भरला अर्जमहायुतीच्या उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन, मतदारांचा ओसांडणारा उत्साह ! मंत्री - आमदारांसह कार्यकर्त्यांनी धरलेला फेर ! !महायुतीचे उमेदवार घोषित, २३ नगरसेवकांचा समावेश ! शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल ! !

जाहिरात

 

निवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या जनसुराज्य शक्ती पक्ष - आरपीआयकडे असतील : समित कदम

schedule31 Dec 25 person by visibility 128 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट एकत्र आले आहेत. या निवडणुकीत एक सक्षम पर्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. शहर विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून आम्ही दोघे एकत्र आलो आहोत.  निवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या जागा जनसुराज्य शक्ती पक्ष- आरपीआयकडे असतील अशी स्पष्ट ग्वाही जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
 जनसुराज्य शक्ती पक्ष व आरपीआय आठवले गट यांच्यातर्फे महापालिका निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे 28 तर आरपीआयचे दोन उमेदवार आहेत. तसेच आणखीन काही उमेदवार वाढू शकतात असेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कदम म्हणाले, आरपीआय आठवले गटाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले व जनसुराज्य शक्ति पक्षाचे प्रमुख व आमदार विनय कोरे यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेतून  एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. जनमानसात  चांगली प्रतिमा असलेले व सक्षम उमेदवार पक्षाकडे आकर्षित झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून एक सक्षम पॅनेल देण्याचा प्रयत्न केला आहे असे त्यांनी सांगितले. आरपीआयचे प्रा. शहाजी कांबळे व उत्तम कांबळे म्हणाले, महायुतीकडे आरपीआयने सहा जागा मागितल्या होत्या. मात्र महायुतीकडून आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत. जनसुराज्य शक्ती पक्षाने आरपीआय या एकाच विचाराने काम करणारे पक्ष आहेत. कोल्हापूर शहराचा विकास व कार्यकर्त्यांचा स्वाभिमान डोळासमोर ठेवून आम्ही ही निवडणूक एकत्र लढवीत आहोत.  महापालिका निवडणूक झाल्यानंतर सुद्धा महापालिकेत आरपीआय आणि  जनसुराज्य स्वतंत्र गट म्हणून बसतील.
 पत्रकार परिषदेला  आमदार अशोक माने , जनसुराज्य शक्ती पक्षाचे निवडणूक समन्वयक शांतीभाई लिंबानी, महेश बराले, रमेश पुरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान जनसुराज्यशक्ती पक्ष व आरपीआय  30 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक सहामधून राहुल सूर्यकांत घाटगे, प्रभाग क्रमांक सातमधून पूजा श्री उदय साळोखे, प्रभाग क्रमांक आठमधून रमेश नागेश खाडे, स्वाती प्रवीण लिमकर प्रभाग क्रमांक आठमध्ये ऋतुजा दत्तात्रेय मसवेकर, अनिल अमृतराव पाटील,  प्रभाग क्रमांक दहामध्ये अक्षय विक्रम जरग, सुजाता मोहनराव चव्हाण,  प्रसाद सुजित चव्हाण उमेदवार आहेत.प्रभाग क्रमांक 11 मध्ये महेश यशवंत बराले, कुणाल संभाजी शिंद,  रमा रतन पचरवाल,  शारदा संभाजी देवणे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 12 मध्ये रमेश शामराव पुरेकर,  प्रीती अतुल चव्हाण,  अमृता सुशांत पोवार, प्रभाग क्रमांक 13 मध्ये मधुरिमा रवीकरण गवळी,  पद्मजा जगमोहन भुरके, रणजीत मंडलिक, शेखर जाधव उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये पूजा विशाल शिराळकर, सुमित उमेश साटम,  प्रभाग क्रमांक 17 मध्ये रशीद बारगीर, ज्योती कमलाकर भोपळे,  वैशाली दत्ता मिसाळ यांची उमेदवारी घोषित झाली. प्रभाग क्रमांक 18 मध्ये दिपाली संदीप पवार,  प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुभाष रामुगडे,  रणजीत बाळासाहेब साळोखे, सविता निवास भोसले आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये योगेश अशोक अजाटे हे उमेदवार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes