लेटलतिफांवर कारवाईचा डोस, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांना नोटीस
schedule11 Dec 25 person by visibility 67 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. कामात अनियमितता असल्याने वेतनवाढ का रोखू नये अशी नोटीस दहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गेल्या आठवडयात मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांनी हसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान अधिकारी आणि कर्मचारी हे वेळेवर कामावर येत नसल्याचे आढळले. सीईओ कार्तिकेयन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पिंपळे यांनी, साध्या वेशात आरोग्य केंद्रात जाऊन रुग्णांशी संवाद साधला होता. तसेच उशिरा येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुनावले होते.तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. त्या चौकशी अहवालाच्या आधारे दहा जणांना कारणे दाखवा नोटीस काढली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, आरोग्य सहायक विठठल ईश्वर कुंभार, विजय शंकर मोरे, गीता सुभाष कांबळे, औषध निर्माण अधिकारी मिथिला सावळवाडे, आरोग्य सेवक उषा अंकुश डोणे, कनिष्ठ सहायक संपत पाटील, परिच साईप्रसाद काळे, वाहन चालक अरुण कांबळे यांना कामात अनियमितता दिसत असल्याने वेतनवाढ का रोखू नये अशी नोटीस काढली आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची वर्षभरातील कामकाजांच्या अनुषंगाने बारा मुद्यांविषयी लेखी खुलासा सादर करण्याच्या सूचना आहेत.