डॉ. जे. एल. नागांवकर, डॉ. शशिकांत कुलकर्णींना जीवन गौरव पुरस्कार
schedule10 Dec 25 person by visibility 33 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रातील योगदान व आरोग्य सेवेसह समाजकार्यातील उल्लेखनीय कामाबद्दल कोल्हापुरातील ख्यातनाम डॉ. जनार्दन लक्ष्मण तथा जे. एल. नागांवकर व डॉ. शशिकांत राजाराम कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ संघटना व असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय लैंगिकताशास्त्रावर राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.
डॉ. जे. एल.नागांवकर यांनी, १९७० साली कोल्हापूरमध्ये वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात केली. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दहा वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. या ठिकाणी काम करताना अनेक विद्यार्थ्यांना प्रेरित केले. उत्कृष्ट अध्यापनाद्वारे वैद्यकीय शिक्षणा भर घातली. १९७८ मध्ये ते, ‘कोल्हापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ संघटनेचे संस्थापक मानद सचिव होते. १९८० मध्ये ते या संघटनेचे अध्यक्ष बनले. त्यांनी, महिलांची आरोग्य सेवेत मोलाचे योगदान दिले. कोल्हापुरात अनेक दशके या क्षेत्रात काम करताना आरोग्य सेवेत व वैद्यकीय क्षेत्रात आदराचे स्थान प्राप्त केले. डॉ. नागांवकर यांना संगीताची खास आवड आहे. हार्मोनियम व ऑर्गन वादनाची आवड आहे. ते विविध संस्थेशी निगडीत आहेत. गायन आणि कलाक्षेत्राशी संबंधित संघटना, संस्थेशी निगडीत आहेत.
डॉ. शशिकांत कुलकर्णी यांचा जन्म दहा नोव्हेंबर १९४९ रोजीचा. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील. वैद्यकीय शिक्षण अर्थात एमबीबीएस व एम.डी. – ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथे केले. त्यांनी, १९८० मध्ये कोल्हापुरात वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. १० वर्षे होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून सेवा केली. १९९१ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथे नियुक्ती, त्यानंतर सी.पी.आर. सरकारी रुग्णालय येथे वयाच्या ५८ वर्षांपर्यंत सातत्याने सेवा केली. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून योगदान दिले. स्वतःचे हॉस्पिटल — अल्ट्रासोनोग्राफी, लेप्रोस्कोपीची सुविधा उपलब्ध केली. पत्नी नीला कुलकर्णी (अॅनेस्थेसियोलॉजिस्ट) यांचे मोठे सहकार्य आहे. डॉ. शशिकांत कुलकर्णी यांनी, वयाच्या ७० व्या वर्षी सर्व सेवा व प्रॅक्टिसमधून निवृत्ती घेतली आहे.