Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ङङज्ञथथ यतस्ट्राँग रुमसमोरील खाजगी सीसीटीव्ही काढण्याचा प्रशासनाचा काय अधिकार? सतेज पाटीलांची अधिवेशनात विचारणास्त्रीरोग -प्रसूतीतज्ज्ञ संघटनेतर्फे लैंगिकताशास्त्रावर राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद अभियंता तरुण पिढीने उद्योजकीय मानसिकता बाळगावी - दीपक जोशी२१ लिटर दुधाची म्हैस, ३५ लिटर दुधाची गाय ठरली गोकुळश्रीकोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करा-: अमल महाडिकांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीएनएमएमएस परीक्षा 28 डिसेंबरलासीपीआरमधील वैद्यकीय बिलांच्या चौकशीसाठी समिती, पालकमंत्र्यांचे आदेशाने समिती स्थापन रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची आयुक्तांच्याकडे मागणी महापालिकेची अंतिम मतदार यादी पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला यादी जाहीर होणार

जाहिरात

 

स्त्रीरोग -प्रसूतीतज्ज्ञ संघटनेतर्फे लैंगिकताशास्त्रावर राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद

schedule10 Dec 25 person by visibility 47 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर स्त्री रोग आणि प्रसूतीतज्ञ संघटना व असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक अ‍ॅण्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी  यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय लैंगिकताशास्त्रावर राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम. जे. नागावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे परिषद होत आहे.

लैंगिक आरोग्य हे एकूण आरोग्याचा एक आवश्यक भाग आहे. पण याबद्दल अनेक गैरसमज असतात. यामुळे चिंता आणि आरोग्याबाबतचे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. याकरिता डॉक्टरांचा सल्ला मोलाचा आहे. यामुळे तुमचे जीवन आनंदी बनू शकते  या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि नामांकित सेक्सोलॉजिस्ट डॉ. प्रकाश कोठारी यांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. परिषदेचे उद्घाटन १३ डिसेंबर रोजी शनिवारी दुपारी दोन  वाजता डॉ.प्रकाश कोठारी,डॉ. राजशेखर ब्रह्मभट्ट, डॉ. टी एस सत्य नारायण राव, डॉ. नारायण रेड्डी, महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. किरण कुर्तकोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. डॉ. दीपक जुमानी, डॉ. पद्मिनी प्रसाद,  डॉ.शिरीष मालदे यांच्यासह इतर अनेक ख्यातनाम तज्ज्ञ लैंगिकतेबद्दल विविध विषयांवर व्याख्याने देणार आहेत.
या परिषदेत यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. जे. एल. नागांवकर व डॉ. शशिकांत कुलकर्णी यांना त्यांच्या समाजकार्यासाठीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर हा कार्यक्रम होईल. परिषदेचे संयोजन संघटनेचे अध्यक्ष नागावकर, संघटनेचे सचिव डॉ. रणजीत किल्लेदार, डॉ. प्रशांत शहा, डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. इंद्रनील जाधव, डॉ. गौरी सईप्रसाद, डॉ. रूपा नागावकर, डॉ. दादासाहेब पाटील, डॉ. किशोर केसरकर आणि डॉ. गौरी केणी करणार आहेत.
 

…………….....................................................

चौदा डिसेंबर रोजी सार्वजिनक खुला मंच

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात १४ डिसेंबर रोजी हॉटेल सयाजी येथील मेघ मल्हार सभागृह येथे सार्वजिनक खुला मंचचे आयोजन केले आहे. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, लैंगिकतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ हे सर्व वयोगटांमध्ये आढळणाऱ्या लैंगिक आरोग्यविषयक समस्या, गैरसमज व वैज्ञानिक सत्य याबाबत माहितीपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. नारायण रेड्डी, डॉ. प्रसन्न गद्रे, डॉ. मानसी जैन, देवयानी एम. आणि निरंजन मेढेकर हे सार्वजनिक मंचात उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन करतील. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. संदीप पाटील, डॉ. मदन कांबळे करणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes