Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी सतीश घाळी, उपाध्यक्षपदी वैभव सावर्डेकर कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह शिक्षकांचा अभ्यास दौरा, जागतिक स्तरावरील शाळा भेटीचाधूल चेहरे पे थी, लेकिन आईना साफ करता रहा ! मुश्रीफांचा संजय मंडलिकांना उद्देशून टोलानगरसेवकांच्या पसंतीतून गटनेत्याची निवड, घोषणा कोल्हापुरातून नव्हे भाजपा प्रदेशकडून होणारमहापौर - उपमहापौर निवड तीस किंवा ३१ जानेवारीला! महापालिकेने मागविले निवडीसंबंधी मार्गदर्शन ! !शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, नूतन नगरसेवकांचा सत्कार क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!कोल्हापूर - इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव !जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !

जाहिरात

 

कोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करा-: अमल महाडिकांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी

schedule09 Dec 25 person by visibility 279 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करावे अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री पाटील यांना या मागणीचे निवेदन दिले. कोल्हापूर शहरामध्ये नुकतेच उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कार्यान्वित झाले आहे. कोल्हापूरकरांच्या गेल्या अनेक वर्षांच्या या सर्किट बेंचच्या रूपाने यश आले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक खटले सर्किट बेंचच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. सर्किट बेंचच्या नूतन इमारतीचे बांधकाम शेंडा पार्क परिसरामध्ये होणार आहे. लवकरच उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्याची शक्यता आहे. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे. भविष्यातील संधींचा विचार करता कोल्हापूरमध्ये शासकीय विधी महाविद्यालय सुरू होणे गरजेचे आहे. ही बाब ध्यानात घेऊन आमदार अ महाडिक यांनी कोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करण्यासाठी मागणी केली आहे. यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री पाटील यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes