जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन साजरा, कार्तिकेयन एस यांच्या हस्ते ध्वजारोहण
schedule02 May 25 person by visibility 56 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंग राष्ट्रगीत, राज्यगीत गायन केले. जिल्हा परिषद कर्मचारी कलामंचच्यावतीने देशभक्तीपर गीत गायन सादर झाले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई , ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अरुण जाधव, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परिट, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सागांवकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे , माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूध्द पिंपळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रमोद बाबर. उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुणा हसबे उपस्थित होते.