न्यू एज्युकेशन सोसायटीचा शाहू विकास आघाडीला पाठिंबा
schedule06 Jul 22 person by visibility 530 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापू जिल्हा . शि. निवडणूकीच्या निमित्ताने पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांना भेट दिली. उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीच्या पॅनेलला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. संस्थचे सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी शाहू आघाडीला पाठिंबा देत कोजीमाशीत परिवर्तन अटळ असल्याचे सांगून विजय आपलाच असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रा. विनय पाटील, के. के. पाटील, उदय पाटील, महेश सूर्यवंशी, उमेदवार सूर्यवंशी मॅडम उपस्थित होत्या.