महापालिकेची अंतिम मतदार यादी पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला यादी जाहीर होणार
schedule09 Dec 25 person by visibility 86 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सध्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी पाच दिवसाची मुदत वाढवली. यापूर्वी दहा डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार होती. आता प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासंदर्भात मंगळवारी 9 डिसेंबर रोजी यासंदर्भातील नव्याने आदेश काढला. सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी 15 डिसेंबर रोजी तर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी 20 डिसेंबर रोजी तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे.