शिवाजी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षक - प्रशासकीय सेवक पुरस्कारांची घोषणा, बुधवारी वितरण समारंभ
schedule17 Nov 26 person by visibility 187 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: शिवाजी विद्यापीठा तर्फे देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिन समारंभ निमित्त आयोजित कार्यक्रमात बुधवारी 18 नोव्हेंबर 2026 रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक पुरस्कारांची घोषणा कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केली.
यामध्ये विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागातील प्रा. केशव राजपुरे, रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा. संजय कोळेकर यांच्यासह प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी, उपकुलसचिव विभा अंत्रेडी आदींचा समावेश आहे. बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार मलकापूर येथील डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जयवंत इंगळे यांना जाहीर झाला आहे. वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांच्या हस्ते उद्या पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
कुलगुरू डॉ. कामत यांनी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांची घोषणा केली. त्यानुसार विविध गटांतील पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे-
विद्यापीठस्तरीय विविध पुरस्कार असे-
गुणवंत शिक्षक: प्रा. केशव राजपुरे आणि प्रा. संजय कोळेकर. गुणवंत प्रशासकीय सेवक वर्ग १: विभा एल. अंत्रेडी आणि रमजान इलाही शेख. गुणवंत प्रशासकीय सेवक वर्ग २: उदय खेडकर आणि अनिल साळोखे. गुणवंत प्रशासकीय सेवक वर्ग ३: आनंदराव खामकर आणि संजय वसंत कोरवी. गुणवंत प्रशासकीय सेवक वर्ग ४: बाळू गणपती मेथे आणि देवगोंडा रामा चौगुले
संलग्न महाविद्यालयीन स्तरावरील पुरस्कार असे-
गुणवंत प्राचार्य: डॉ. राजेंद्र गोपाळ कुलकर्णी आणि डॉ. राजाराम शंकर साळुंखे. गुणवंत शिक्षक: डॉ. सचिन सुभाष पाटील आणि डॉ. एन. बी. मासाळ. गुणवंत सेवक वर्ग ३: मंगल युवराज कांबळे, न्यू कॉलेज, कोल्हापूर. गुणवंत सेवक वर्ग ४: राजू भीमसेन दोडमणी, ग्रंथालय परिचर, काकासाहेब चव्हाण महाविद्यालय, तळमावले. बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. जयवंत इंगळे, डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर