+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Mar 23 person by visibility 506 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी भरीव तरतूद, रग्बी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नियोजन, सेंद्रीय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद, तृणधान्य बियाणासाठी पन्नास टक्के अनुदान, बांधकाम विषयक मटेरियल चाचणीसाठी प्रयोगशाळा निर्मिती, ग्रामीण भागात मागासवर्गीय वस्तीमध्ये ओपन जीम आणि विद्यार्थ्यासाठी रमाई वाचनालय हे जिल्हा परिषदेच्या २०२३-२०२४ च्या अंदाजपत्रकाचील ठळक वैशिष्ट्ये आहेत.
जिल्हा परिषदेची शुक्रवारी (२४ मार्च) सर्वसाधारण सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मुख्य वित्त अधिकारी व्ही. टी. पाटील यांनी या सभेत बजेट सादर केले. या सभेत २०२३-२४ साठीचे ३८ कोटी ६७ लाख ५६ हजार ३५५ रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेचे १८ लाख ७५ हजार २१२ रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर केले आहे. यंदाच्या वर्षात ३८ कोटी ८६ लाख ३१ हजार ५६७ रुपये इतकी जमा अपेक्षित आहे. तर खर्चासाठी ३८ कोटी ६७ लाख ५६ हजार ३५५ रुपयांची तरतूद केली आहे. या सभेत जिल्हा परिषद स्वनिधी व पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती निधीचे सन २०२२-२३ चे अंतिम सुधारित ५५ कोटी दोन लाख ७७ हजार ७९२ निधीस मंजुरी दिली. जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू सभागृहात सर्वसाधारण सभा झाली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत संपली आहे. जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक आहेत. बजेटमध्ये शिक्षण विभाग (बजेटमध्ये तरतूद रक्कम, २,५८, ४७,२५५ रुपये), बांधकाम विभाग (३ कोटी २७ लाख रुपये), कृषी विभाग (१ कोटी ५५ लाख ११ हजार रुपये), पशुसंवर्धन विभाग (१,७८,५२,००० रुपये), समाजकल्याण विभाग (५,३९,६२,०००), दिव्यांग व्यक्तीसाठी कल्याणकारी योजना (२,५६,१५,१०० रुपये), महिला व बालकल्याण विभाग (२,८३,३०,०००), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग (३,०८,०४,०००), पाटबंधारे विभाग( चाळीस लाख रुपये), आरोग्य विभागसाठी (१,२०,३१, ००० रुपये ) इतकी तरतूद केली आहे.
…………
अंदाजपत्रकातील ठळक तरतुदी पुढीलप्रमाणे : समग्र शिक्षा अभियान व्यतिरिक्त इतर मुलांना गणवेश वाटपासाठी वीस लाख रुपये, जिल्हा परिषद शाळांना विज्ञान प्रयोगाचे साहित्य पुरविण्यासाठी पाच लाख रुपये, प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप मॉड्यूल तयार करणे व सराव परीक्षा घेण्यासाठी आठ लाख, डॉ. जे. पी. नाईक समृद्ध शाळेसाठी तीन लाख रुपयांची तरतूद आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात येणार आहे. बांधकामसंबंधी सगळया मटेरियलची चाचणी या ठिकाणी होईल. जिल्हा परिषदेच्या पैशाची बचत व नवीन उत्पन्न असा दुहेरी उद्देश आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीचे फायर ऑडिसाठी वीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. कृषी विभागातर्फे पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित औजारे व अन्य साहित्यसाठी ६० लाख, बायोगॅस बांधकामासाठी पूरक अर्थसहायसाठी दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रीय शेती प्रोत्साहन योजनेसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पन्नास टक्के अनुदानावर गळीत धान्य व कडधान्य बियाणे, तृणधानय बियाणे पुरविण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागातर्फे सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना कम्युटर प्रशिक्षणसाठी वीस वलाख रपयांची तरतूद आहे.आरोग्य विभागातंर्गत ग्राम आरोग्य संजीवनी, आशा संजीवनी कार्यक्रमासाठी वीस लाखााची तरतूद आहे.
………..
सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागाच्या योजनांची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, बांधकाम विभागाचे सचिन सांगावकर, आरोग्य अधिकारी योगेश साळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. विनोद पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे आदी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. 
…………..
‘शिक्षण, कृषी,आरोग्य, पशुसंवर्धन, समाजकल्याण, दिव्यांग, पाणी पुरवठा व महिला बालकल्याण विभाग अशा विविध घटकांसाठी बजेटमध्ये तरतुदी केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीच्या योजना राबविताना नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे.सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन,बांधकाम विभागाची प्रयोगशाळा, रमाई वाचनालय, ओपन जीम या बाबी समाविष्ठ आहेत.”
-संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
…………