युवा ग्रामीण पतसंस्थेस ४६ लाखाचा नफा – चेअरमन अर्जुन आबिटकर
schedule06 Apr 26 person by visibility 23 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ग्रामीण अर्थकारणाला पाठबळ मिळावे यासाठी युवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, गारगोटी संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेस २०२५-२६ याआर्थीक वर्षात संस्थेला ४६ लाख रूपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून युवा ग्रामीण पतसंस्थेची ओळख आहे. संस्थेमार्फत डिजीटल बँकींग सुविधा, आरटीजीएस, आयएमपीएस, एसएमएस, मोबाईल बँकींग, लॉकर सुविधा, पिग्मी ॲप, विजबील भरणा आदी सुविधा सुरू आहेत. संस्थेच्या राधानगरी, भुदरगड तालुक्यांमध्ये पाच शाखा असून व मुख्य कार्यालय स्वतंत्र आहे. युवा पतसंस्था नेहमीच व्यवसायिक दृष्टीकोन ठेवून काम करत असल्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विश्वास संस्थेने मिळवला असल्याचे आबिटकर यांनी केले. सभासदांनी पतसंस्थेवर विश्वास ठेवून २८ कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत. संस्थेची आठ कोटी ५३ लाख इतकी गुंतवणूक असून कर्ज वाटप २२ कोटींच्या जवळपास पोहोचले आहे. तसेच वार्षिक उलाढाल अंदाजे २३९ कोटी इतकी झाली असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन आबिटकर, व्हा.चेअरमन बाजीराव खापरे, मॅनेजर चंद्रकांत गाडेकर यांच्यासह संचालक मंडळाने दिली.