Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

पदोन्नतीच्या फरकाची रक्कम जमा, प्राध्यापक महासंघातर्फे अधिकाऱ्यांचा सत्कार

schedule06 Apr 26 person by visibility 363 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागील वीस वर्षापासून प्रलंबित पदोन्नतीमधील फरकाची रक्कम, वैद्यकीय बिले शिक्षण सहसंचाल कार्यालयाकडून विद्यापीठाकडे जमा झाली आहेत. तब्बल तेरा कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या प्रश्नाची सोडवणूक झाल्याबद्दल प्राध्यापक व कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

‘उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विद्यापीठाच्या प्रभारी प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कोल्हापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडली.  प्रलंबित बाबी बाबत अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते. ’असे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यातर्फे विद्यापीठाच्या प्रभारी प्रकुलगुरू डॉ ज्योती जाधव, शिक्षण सहसंचालक डॉ. बच्छाव, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, उप कुलसचिव श्रीमती प्रिया देशमुख, आणि अंतर्गत लेखापरीक्षक अजित चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाचे पदाधिकारी डॉ एन बी गायकवाड, डॉ एस टी कोंबडे,डॉ. पी डी पाटील, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. आर व्ही गुरव, डॉ. राहुल माने, डॉ. एस जी घाणे, आणि डॉ कबीर खराडे उपस्थित होते.  अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ शिक्षकांसाठी काम करत असला तरी आपल्या विद्यापीठातील शिक्षके-तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडून सोडवून घेतले आहेत आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ इथून पुढे विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील असल्याचे अध्यक्ष डॉ. एन. बी. गायकवाड यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes