Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भगवान महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी नवकार महामंत्र पठण अक्कमहादेवी पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात, सुजाता विभूते, संगीता करंबळी सन्मानितवैद्यकीय अधिकारी सक्तीच्या रजेवरबसव केंद्रातर्फे चित्रदुर्ग मठात मासिक अनुभव मंटप कार्यक्रम उत्साहात शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांचा कार्यालय प्रवेश३७२ क्रीडापटूंचे सरकारी सेवेत थेट समावेशन, क्रीडापटूंना आर्थिक बळ देण्यासाठी रोख पारितोषिकेबांधकाम समिती सभापती सारिका नांंदेकर यांचा कार्यालय प्रवेशभुदरगड- चंदगड तालुक्यांपुढे स्वित्झर्लंड देशही फिका, पर्यटनस्थळे विकसित करण्याची गरजउदय सामंत म्हणाले, २०२९ मधील निवडणुकीत संजय मंडलिक हे लोकसभेचे उमेदवारवडगाव येथील मच्छीमार ठेकेदाराचा आत्मदहनाचा इशारा

जाहिरात

 

अक्कमहादेवी पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात, सुजाता विभूते, संगीता करंबळी सन्मानित

schedule06 Apr 26 person by visibility 56 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :येथील वीरशैव लिंगायत समाज व अक्कमहादेवी वीरशैव महिला मंडळातर्फे अक्कमहादेवी जयंती व पुरस्कार वितरण समारंभ दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अक्कमहादेवी पुरस्कारांनी सुजाता विभूते व संगीता करंबळी यांना गौरविण्यात आले. वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.बिंदू चौकातील अक्कमहादेवी मंटप येथे कार्यक्रम झाला.

याप्रसंगी बोलताना डॉ. छाया पाटील यांनी, अक्कमहादेवी यांच्या विचार कार्याचे महत्व पटवून दिले. ‘महायोगिनी अक्कमहादेवी यांनी बंधुता व स्त्री समानतेसाठी जे कार्य केले ते नेहमीच मार्गदर्शक आहे. त्यांनी बाराव्या  शतकात स्त्री सबलीकरण व सक्षमीकरणाचा विचार मांडला. ’असे त्या म्हणाल्या. प्रारंभी अक्कमहादेवीचा जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रम झाला. अक्कमहादेवी महिला मंडळातर्फे भजन संध्या कार्यक्रम झाला. ज्येष्ठ कार्यकर्त्या सरला पाटील, प्रियांका खोत यांचा सत्कार करण्यात आला. वीरशैव समाजाचे अध्यक्ष किरण गवळी, राहुल नष्टे, सुनील गाताडे, चंद्रकांत हळदे, वैभव सावर्डेकर, सुभाष चौगुले, सुहास भेंडे, राजू वाली, उमा गाताडे, वीणा सावर्डेकर, वैष्णवी वडगावे, सुमन हळदे, मंदा कुलकर्णी, अन्विशा नासीपुडे, मंदा सावर्डेकर, अमृता करंबळी, स्मिता हळदे,  सिया मुरंदडे, ज्योती कदम, द्राक्षायणी हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती होती. मंदा बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. सविता सन्नकी यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes