Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भगवान महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी नवकार महामंत्र पठण अक्कमहादेवी पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात, सुजाता विभूते, संगीता करंबळी सन्मानितवैद्यकीय अधिकारी सक्तीच्या रजेवरबसव केंद्रातर्फे चित्रदुर्ग मठात मासिक अनुभव मंटप कार्यक्रम उत्साहात शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांचा कार्यालय प्रवेश३७२ क्रीडापटूंचे सरकारी सेवेत थेट समावेशन, क्रीडापटूंना आर्थिक बळ देण्यासाठी रोख पारितोषिकेबांधकाम समिती सभापती सारिका नांंदेकर यांचा कार्यालय प्रवेशभुदरगड- चंदगड तालुक्यांपुढे स्वित्झर्लंड देशही फिका, पर्यटनस्थळे विकसित करण्याची गरजउदय सामंत म्हणाले, २०२९ मधील निवडणुकीत संजय मंडलिक हे लोकसभेचे उमेदवारवडगाव येथील मच्छीमार ठेकेदाराचा आत्मदहनाचा इशारा

जाहिरात

 

भगवान महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी नवकार महामंत्र पठण

schedule06 Apr 26 person by visibility 9 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो ) कोल्हापूर, इचलकरंजी, चॅप्टरतर्फे गुरुवारी, नऊ एप्रिल २०२६ रोजी सामूहिक नवकार महामंत्र पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक जैन मंदिर आणि तीर्थक्षेत्रांसह विविध ठिकाणी नवकार महामंत्र पठणाचा कार्यक्रम होईल. सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात वीस हजारांहून अधिक जण सहभागी होतील अशी माहिती ‘जीतो’कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष रवी संघवी व सचिव अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय घोडावत ग्रुपच्या सहकार्याने कोल्हापूर शहर आणि जवळच्या ग्रामीण भागासाठी जैन बांधवासाठी महासैनिक दरबार हॉल येथे महामंत्र पठण होईल. याठिकाणी पाच हजार श्रावक, श्राविका सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान महावीरांचा विश्वशांती, अहिंसेचा संदेश जगाला मिळावा हा उद्देश आहे. सकाळी साडेसात वाजता भक्तीसंगीत, आठ वाजून वीस मिनिटे ते नऊ वाजून वीस मिनिटे या वेळेत नवकार महामंत्र पठण होईल. दरम्यान या उपक्रमाचे उद्घाटन दिल्ली येथून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार आहे.

विश्वशांतीसाठी आयोजित नवकार महामंत्र कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ‘https://navkardivas.jitoworld.org’ येथे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. पत्रकार परिषदेला जीतोचे समन्यवक जितेंद्र राठोड, राजीव परीख, गिरीश शहा, रवींद्र देवमोरे, माया राठोड, स्वीटी पोरवाल, मिनल शहा, डॉ. पूजा पाटील, सपना शहा आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes