Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रोटरी क्लब ऑफ गार्गीजर्फे  यामिनी प्रदर्शनजिप पदाधिकाऱ्यांची कर्मचारी सोसायटीला भेट, कामकाजाचे केले कौतुक ! जिल्हा परिषदेची बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा रद्दशिक्षक -पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 23 ऑक्टोबरला मतदानपुणे पदवीधर- शिक्षकसाठी महायुतीतील पक्षांची वाटचाल स्वतंत्रपणे लढण्याकडे ! मंत्र्यांच्या विधानांनी मैत्रीपूर्ण लढतीचे चिन्हे अधिक !!कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!

जाहिरात

 

रोटरी क्लब ऑफ गार्गीजर्फे  यामिनी प्रदर्शन

schedule23 Sep 26 person by visibility 5 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिध : रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे २६, २७ आणि २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मेघ मल्हार हॉल, सयाजी हॉटेल, येथे यामिनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. प्रदर्शनात एक्स्क्लुझिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाईन्स, पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच मुंबई, पुणे, सुरत, इंदोर, जयपूर, गोवा, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टिव्हल्स स्टॉल्स असे ११५ हून अधिक स्टॉल्स असलेले हे यामिनी प्रदर्शन भरविण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष सौ. सविता पदे, यामिनी चेअरमन डॉ हेमलता कोटकर, सचिव.सौ सीमा मलानी, रोटरी सदस्या सौ साधना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर रुपाराणी संग्रामसिंह निकम, यांच्या हस्ते होणार आहे. भागीरथी महिला संस्थेच्या प्रमुख अरुंधती महाडिक या प्रमुख पाहुण्या आहेत. या प्रदर्शनासाठी क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह रोटेरियन शोभा तावडे,  गिरिजा कुलकर्णी,  रेणुका सप्रे, दीपिका कुंभोजकर, कल्पना घाडगे, सुप्रिया डोइजड, प्रिया आरगे, मेघना शेलके, योगिनी कुलकर्णी,  जया महेश्वरी, रेखा सारड़ा, सुजाता लोहिया,  मधुलिका जाधव,  अंजली मोहिते, सुरेखा इंग्रोळे, सुरभी पाटील, विशाखा आपटे, डॉ.गीता पिल्लाई  यांच्यासह सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम घेतले आहेत. हे प्रदर्शन २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ आणि २७ व २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes