+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Aug 22 person by visibility 1044 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
भविष्य निर्वाह निधीतील पावणे सात लाख रुपये काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयाततील मुख्य प्रशासकीय अधिकारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. भावना सुरेश चौधरी असे महिला अधिकारीचे नाव आहे.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयात एका तक्रारदाराने त्याच्या भविष्य निर्वाह निधीतील 90 टक्के रक्कम म्हणजेच सहा लाख 72 हजार काढण्यासाठी अर्ज दिला होता. त्यासाठी आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांनी त्यांच्याकडे सहा हजार सातशे रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज केला. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर आज गुरुवारी रक्षाबंधनाच्या दिवशी कसबा बावडा रोडवरील मुख्य प्रशासकीय इमारतीतील आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयात सापळा रचण्यात आला. या कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रक्षाबंधन सण असल्याने सर्व कर्मचारी नटून थटून आले होते. मुख्य प्रशासकीय अधिकारीही चौधरी ही नटून-थटून आल्या होत्या. तक्रारदाराने चौधरी यांची भेट घेतल्यानंतर लाचेच्या सहा हजार सातशे रुपये रकमेपैकी 5000 रक्कमेवर तडजोड झाली. ही रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकारी आणि पोलिसांनी भावना चौधरी यांना लाच घेताना रंगेहात पकडले. या घटनेने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत खळबळ उडाली. पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल शरद पोरे, मयूर देसाई, रुपेश माने, संदीप पडवळ, छाया पाटोळे यांनी कारवाईत भाग घेतला.