कमर्शियल बँकेचा नावलौकिक उंचावणारा कामकाज करू : गौतम जाधव, राजेंद्र डकरेंची ग्वाही
schedule16 Mar 23 person by visibility 270 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "बँक व सभासदांच्या हिताच्या नवनवीन योजना, काटकसरीचा कारभार आणि व्यवसाय वृद्धी या त्रिसूत्रीच्या आधारे कामकाज करून दि कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचा नावलौकिक आणखी उंचावू"अशी ग्वाही विद्यमान चेअरमन गौतम जाधव व संचालक राजेंद्र डकरे यांनी दिली
दि कमर्शियल को-ऑपरेटिव बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली या निवडणुकीमध्ये शिंदे-कणेरकर सत्ताधारी पॅनेलने चौदापैकी चौदा जागा जिंकल्या. चौदापैकी तीन जागा बिनविरोध झाल्या तर उर्वरित अकरा जागेसाठी प्रत्येक निवडणूक झाली होती.
"सभासदांनी मोठ्या विश्वासाने सत्ताधारी संचालक मंडळाकडे बँकेचा कारभार सोपविला आहे. सभासद मतदारांचा हा विश्वास संचालक मंडळ नक्कीच साथ ठरवेल. दि कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचा लौकिक मोठा आहे. शहरातील जुनी व नामांकित बँक म्हणून कमर्शियलची ओळख आहे. बँकेचे नेतृत्व सहकारातील जाणत्या मंडळींनी केले आहे. कणेरकर-कसबेकर-शिंदे या धुरीणांनी बँकेच्या कामकाजासंबंधी जी मार्गदर्शप नियमावली घालून दिली आहे, त्या पद्धतीने बँकेची वाटचाल सुरू आहे. सभासद हिताच्या योजना नेहमीच प्राधान्य राहिले आहे. लाभांश वाटपातही बँक अग्रेसर आहे."असे चेअरमन गौतम जाधव यांनी सांगितले.
गौतम जाधव म्हणाले, "निवडणुकीच्या कालावधीत सभासदांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सभासदांनी प्रत्यक्ष निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने सत्ताधारी उमेदवारांना निवडून देत कामकाजावर विश्वास व्यक्त केला. दरम्यान बँकेच्या एका माजी अध्यक्षानी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात खो घातला. मात्र सभासद मंडळी सत्ताधारी संचालकांच्या सोबत राहिले."
संचालक राजेंद्र डकरे म्हणाले, "कोल्हापुरातील एक नामांकित बँक म्हणून एक कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेची ओळख आहे. बँकेच्या लौकिकाला साजेसे कामकाजाला नेहमीच प्राधान्य असेल. बँकेच्या निवडणुकीत एका माजी अध्यक्षाने बँकेचा विचार करून बिनविरोधाच्या प्रयत्नांना साथ द्यायला हवी. निवडणूक टाळता आली असती. नूतन संचालक मंडळ हे सक्षम आहे. बँकेच्या विकासाचा आणि सभासदांच्या हिताचा कारभार नक्कीच होईल."