+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Mar 24 person by visibility 452 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : छत्रपती संभाजीनगरमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांनी दिली.
 कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना अनुसूचित जाती जमाती विभाग शहरप्रमुख  प्रभू गायकवाड यांच्या शिवसेना विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन  पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. क्षीरसागर म्हणाले, दक्षिण मतदारसंघातील राजकीय नेत्यांनी नागरिकांना फक्त गाजर दाखविण्याचे काम केले आहे. हा मतदारसंघ दोन गटांच्या वादातच अडकला आहे. त्यामुळे विकास कामे तर दूरच नागरिकांच्या मुलभूत सोईसुविधांचाही बोजवारा उडाला आहे. युवापिढीस राजकारणात गुंतवून स्वत: चा स्वार्थ साधण्याच्या संधीसाधू प्रवृत्तीस या मतदारसंघातील नागरिक कंटाळले आहेत. त्याचमुळे शिवसेनेस पाठबळ वाढत आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण दोन्ही मतदारसंघातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे ८० टक्के समाज कारणाचा मूलमंत्र वापरून कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मध्ये विकास कामांची गंगोत्री प्रवाहित करू. ओपन जिम, खेळणी, क्रीडांगणे, वॉकिंग ट्रॅक, समाज मंदिरे, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून दक्षिण मतदारसंघातील नागरिकांना विकास पर्वाकडे घेवून जाऊ, अशी ग्वाही दिली.   
यावेळी उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, शिवसेना अनुसूचित जाती जमाती विभाग जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, उपशहरप्रमुख कपिल केसरकर, प्रदीप मस्के गुणवंत नागतळे अमित जाधव रुपेश डोईफोडे निहाल मुजावर संजय गाडीवडार प्रदीप देसाई अभिजीत पवार दयानंद नागटिळे अक्षय पट्टण अमर जरग प्रसाद पाटील, अर्जुन शिंदे, किसनराव कल्याणकर, किरण यादव, निवास राऊत उपस्थित होते.