बालिंगा पंपिंगवर अवलंबून असणाऱ्या भागांचा सोमवारी पाणीपुरवठा बंद
schedule16 May 26 person by visibility 40 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सोमवारी १८ मे २०२६ रोजी करण्यात येणार आहे. यामुळे त्या दिवशी विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी दैनंदिन पाणी उपसा होऊ शकणार नसल्याने कोल्हापूर शहरातील चंबुखडीवरून वितरित होणारा सी डी व संलग्न ए बी वॉर्ड तसेच संबंधित उपनगरे व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. संबंधित भागातील दैनंदिन पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. मंगळवार १९ मे रोजी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.
यामध्ये ए व बी वॉर्डसह सलग्न उपनगरे व ग्रामीण भाग, लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजीपेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेतील काही भाग आदी परिसरांचा समावेश आहे.
तसेच संपूर्ण सी व डी वॉर्डमधील दुधाळी परिसर, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस परिसर, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब परिसर तसेच संबंधित ग्रामीण भाग व उपनगरांचा समावेश आहे. तरी नागरिकांनी आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.