Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुटबॉलच्या मैदानातही नगरसेवकच ठरले भारी, अधिकारी संघावर ३-२ गोलफरकांनी विजयबालिंगा पंपिंगवर अवलंबून असणाऱ्या भागांचा सोमवारी पाणीपुरवठा बंदप्राधिकरणला विशेष दर्जा, हद्दवाढ विरोधी कृती समितीतर्फे आमदार चंद्रदीप नरकेंचा सत्कारनेत्यांना हद्दवाढीविषयी देणेघेणे आहे की नाही ? पालकमंत्री, सहपालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : कृती समितीच्या बैठकीत तीव्र भावनासंजय शिंदेंच्या कोल्हापुरातील दीर्घकालीन पदस्थापनेची उच्चस्तरीय चौकशी करावी - प्रकाश बेलवाडेप्राधिकरणाच्या विशेष दर्जाचा हद्दवाढीवर परिणाम नाही, २०२७ च्या जनगणनेनंतर हद्दवाढ अटळच : राजेश क्षीरसागरइंधन बचत हीच राष्ट्रसेवा…शिक्षण समिती सभापती, शिक्षणाधिकाऱ्यांचा बसमधून प्रवासशिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरु कोण ? कुलपती कार्यालयाकडे नजरा राज्यातील पंचवीस बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! सुनील फुलारींची ठाण्यात बदली, रंजन शर्मा कोल्हापूरचे नवे आयजी!!उष्णतेची तीव्र लाट येऊन मान्सूनमध्ये व्यत्यय येऊ शकतो :  शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी

जाहिरात

 

फुटबॉलच्या मैदानातही नगरसेवकच ठरले भारी, अधिकारी संघावर ३-२ गोलफरकांनी विजय

schedule16 May 26 person by visibility 126 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रशासकीय कामकाज व विकासकामांवरुन कधी एकमेकांसोबत तर कधी एकमेकांविरोधात उभे ठाकणारे महापालिकेचे नगरसेवक आणि अधिकारी हे शुक्रवारी फुटबॉलच्या मैदानात उतरले. महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे औचित्य साधून शनिवारी, सोळा मे २०२६ रोजी नगरसेवक व अधिकाऱ्यांच्यामध्ये प्रदर्शनीय फुटबॉल सामना झाला. महापौर इलेव्हन व कमिशनर इलेव्हन या नावांनी खेळलेल्या या सामन्यात नगरसेवकांच्या संघांने अधिकारी संघावर तीन विरुद्ध दोन अशा गोलफरकांनी विजय मिळवला.

येथील छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर हा सामना झाला. २५ मिनिटाचा हा सामना होता. महापौर इलेव्हन संघात उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक विजय खाडे, राहूल माने, स्वरुप कदम, वैभव माने, नियाज खान, आश्किन आजरेकर, अभय तेंडुलकर, करण जाधव, निखिल कोराणे, प्रसाद उगवे, प्रसाद जाधव हे फुटबॉलपटून म्हणून मैदानात उतरले. नगरसेवक संजय मोहिते हे गोलकिपर होते. कमिशनर इलेव्हन संघात महापालिकेतील अधिकारी पारितोष कंकाळ, किरणकुमार धनवडे, सुनील बिदरी, संजय सरनाईक, राम काटकर, राजेंद्र दळवी, अभिजीत सरनाईक, चंद्रकांत पाटील, निखील काळे, सुनील पोवार, रवी पोवार, सचिन इंगवले यांचा समावेश होता. महापौर इलेव्हन संघातील काही नगरसेवकांनी यापूर्वी फुटबॉलपटून म्हणून सामने खेळले होते. यामुळे हा संघ वरचढ ठरत होता. दुसरीकडे कमिशनर इलेव्हन संघात खेळणाऱ्या अधिकाऱ्यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडविले. चांगल्या खेळाचे दर्शन घडवत सामना जिंकण्याचाही प्रयत्न केला.

मात्र खेळातील हार -जीत पेक्षा या प्रदर्शनीय सामन्याचा दोन्ही संघांनी आनंद लुटला. महापौर इलेव्हनकडून पहिल्या गोलची नोंद उपमहापौर अक्षय जरग यांनी केली. प्रसाद उगवे, करण जाधव यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाची गोलसंख्या तीन केली. कमिशनर इलेव्हनकडून खेळताना निखील काळे व सुनील पोवार यांनी गोल नोंदवित आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. अखेर हा सामना महापौर इलेव्हन संघाने तीन विरुद्ध दोन अशा गोलफरकांनी जिंकला. हा सामना जिंकल्यानंतर महापौर इलेव्हन संघातील नगरसेवक खेळाडूंनी हात उंचावून फेर धरत जल्लोष केला. या जल्लोषामध्ये स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे सुद्धा सहभागी झाले.  दुसरा प्रदर्शनीय सामना कोल्हापूर पोलिस संघ विरुद्ध कोल्हापूर महापालिका संघ यांच्यामध्ये झाला. हा सामना कोल्हापूर पोलिस संघाने तीन विरुद्ध दोन अशा गोलफरकांनी जिंकला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes