Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वाशीचे सामाजिक कार्यकर्ते सरदार रानगेंचा भाजपात प्रवेशडीवाय पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढआषाढी वारीत कुलगुरू, प्रकुलगुरू ! शिवाजी विद्यापीठातर्फे स्वच्छतेतून सेवाभाव ! !कोल्हापुरात शुक्रवारी आयटी निर्यात शिखर परिषद, दिल्लीचे डॉ. अभय सिन्हा प्रमुख मार्गदर्शकराज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय - जिल्हाधिकारी संतोष पाटीलवारी आनंदाची ! कोल्हापूर जिल्हा परिषदेची हमी शुद्ध पाणी पुरवठ्याची !!अमर रहे अमर रहे - लाटकर काका अमर रहे ! राष्ट्र सेवादलाकडून मानवंदना, शोकाकूल वातावरणात भरत लाटकरांना अखेरचा निरोप  कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन ! तर सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र !! राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएचडी

जाहिरात

 

वाशीचे सामाजिक कार्यकर्ते सरदार रानगेंचा भाजपात प्रवेश

schedule15 Jul 26 person by visibility 55 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : सर्वसामान्य जनतेसाठी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे कार्यरत असलेले वाशी येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार राजाराम रानगे यांनी  समर्थक व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. नागाळा पार्क येथील भाजपा जिल्हा येथे आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश  झाला.
 उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, विजय जाधव, राहुल चिकोडे, हंबीरराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष पाटील यांनी प्रास्ताविकात रानगे यांनी यापूर्वी धनगर समाज उन्नती मंडळाचे सदस्य, पश्चिम महाराष्ट्र बहुजन दलित सेनेचे अध्यक्ष, शिवबाचा मावळा संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माकोजी रानगे वाशी संस्थेचे अध्यक्ष म्हणून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत असे सांगितले.

मंत्री पाटील म्हणाले, "व्यसनमुक्ती, गोसंवर्धन, होतकरू विद्यार्थ्यांना मदत, वृद्धाश्रमांना सहकार्य अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे तळागाळातील जनतेशी नाळ जोडून त्यांचे दुःख दूर करण्याचे कार्य सरदार रानगे करत आहेत. अशा सामाजिक कार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पक्षवाढीसाठी काम करावे."

आमदार पडळकर यांनी सरदार रानगे यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हिताचे घेतलेले ऐतिहासिक निर्णय, राज्यातील विविध विकासकामे आणि शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

 मान्यवरांच्या हस्ते  रानगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन  पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी बोलताना सरदार रानगे म्हणाले, "भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आणि त्यांच्या समस्या सोडविण्याची तळमळ पाहून मी भाजपामध्ये प्रवेश करत आहे." कार्यक्रमास भिकाजी जाधव, शिवाजी बुवा, डॉ. आनंद गुरव, महेश चौगुले, सुशीला पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रविश पाटील कौलवकर, हंबीरराव पाटील, विकास पाटील, सतीश पाटील, अमित कांबळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes