कोल्हापुरात शुक्रवारी आयटी निर्यात शिखर परिषद, दिल्लीचे डॉ. अभय सिन्हा प्रमुख मार्गदर्शक
schedule15 Jul 26 person by visibility 16 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अंत्यत उपयुक्त अशी ‘कोल्हापूर आयटी निर्यात शिखर परिषद २०२६’चे आयोजन १७ जुलै २०२६ रोजी आयोजित केले आहे. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित या परिषदेला नवी दिल्ली येथील सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे महासंचालक डॉ. अभय सिन्हा हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. कोल्हापुरातील हॉटेल मराठा रिजेन्सी येथे दुपारी चार वाजता ही परिषद होणार आहे. या परिषदेत सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे प्रादेशिक संचालक विवेक बक्षी, निर्यात विभागाचे वरिष्ठ सल्लागार श्रीजीत नायर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील हे परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरातील सॉफ्टवेअर आणि आयटी कंपन्यांना जागितक बाजारपेठेत झेप घेता यावी हा या परिषद आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. अशी माहिती कोल्हापूर आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, सचिव राहूल मेंच यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.