निरोगी-यशस्वी जीवनासाठी आयुर्वेद समजून घ्या-दिलीप गुणे
schedule06 Mar 24 person by visibility 387 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
‘आयुर्वेद हे शाश्वत आरोग्यशास्त्र, उपचारपद्धती म्हणून जगभरात प्रचलित आहे. रोग होऊच नये हेच आयुर्वेदाचे मूळ सूत्र असून आयुर्वेदामध्ये संशोधनासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, त्याचा अवलंब करा व आयुर्वेदिक औषधे, उपचार पद्धती स्वीकारून निरोगी जीवनाचा आनंद घेतला पहिजे.’ असे प्रतिपादन एस्. जी. फायटो फार्मचे दिलीप गुणे यांनी व्यक्त केले.संस्थेचे व्हाइस चेअरमन डी. जी. किल्लेदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
येथील न्यू वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये 6 मार्च राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनाचे औचित्य साधून,”इंडस्ट्री - ॲकडमिया पार्टनरशिप काँनक्लेव्ह 2024” चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून करण्यात आली. कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांनी आयुर्वेदिक मधील संशोधनाच्या संधी व राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनाचे महत्त्व विषद केले. प्रा. वैष्णवी निवेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा.दिव्या शिर्के यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पियूषा नेजदार यांनी परिश्रम घेतले.