+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Mar 24 person by visibility 250 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाविकास आघाडीतून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित आहे. शाहू महाराजांच्या प्रचारासाठी शिवसैनिक ताकतीने मैदानात उतरतील. महाराजांना निवडून आणणार. हा मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. महाराजांच्या प्रचारासाठी तर येऊच शिवाय विजयी सभेला येणार " असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी नवीन राजवाडा येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली या भेटीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चिती करण्यात आली. जवळपास अर्धा तास शाहू महाराज व ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. याप्रसंगी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, तेजस ठाकरे , युवराज मालोजीराजे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील आदी उपस्थित होते.
 या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित आहे. छत्रपती कुटुंबींय व ठाकरे कुटुंब यांच्यामध्ये तीन पिढ्याचे ऋणानुबंध आहेत. पुढील पिढीत हे ऋणानुबंध कायम राहतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९९७-९८ मध्ये शाहू महाराजांना भेटायला आले होते. त्यावेळी मी सोबत  होतो. त्यानंतर आता आलो आहे. येथून पुढे येत राहणार. असेही ठाकरे यांनी सांगितले. सध्याच्या संघर्षात विजयी होण्यासाठी बळ मिळावे म्हणून शाहू महाराजांचे आशीर्वाद घेतले
याचा मला अतिशय आनंद आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारात शिवसेनेचे कार्यकर्ते हताकतीने उतरतील, त्यांना विजयी करतील. त्यांच्या प्रचारासाठी मी येणारच आहे सोबत त्यांच्या विजयी सभेलाही येणार."असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला
दरम्यान नवीन राजवाडा येथे उद्धव ठाकरे यांचे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. यावेळी त्यांचे उत्साही स्वागत झाले. श्रीमंत शाहू महाराज व ठाकरे यांची गळाभेट झाली. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील, आमदार वैभव नाईक,   माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार सुजित मिणचेकर, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, राष्ट्रवादीचे सुनील देसाई, माजी उपमहापौर विक्रम जरग, ईश्वर परमार, उमा बनछोडे, पूजा नाईकनवरे, अवधूत साळोखे आदी उपस्थित होते.