+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Mar 24 person by visibility 947 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. दुपारी साडेतीन वाजता उद्धव ठाकरे यांचे नवीन राजवाड्यावर आगमन झाले. यावेळी ठाकरे व शाहू महाराजांची गळा भेट झाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे उमेदवारी निश्चित मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळ्याच नेत्यांनी कंबर कसली आहे. शाहू महाराजांच्या उमेदवारीला बळ देण्यासाठी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यावेळी खासदार संजय राऊत तेजस ठाकरे आमदार वैभव नाईक, युवराज मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, ठाकरे गटाचे शिवसेनाप्रमुख संजय पवार, विजय देवणे सुनील मोदी रविकिरण इंगवले, माजी आमदार सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते. ठाकरे आणि शाहू महाराजांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.