+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Feb 24 person by visibility 255 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
शरीर सुदृढ बनवण्यासाठी जिममध्ये धोकादायक औषध देणाऱ्या दोघा जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने  अटक केली. प्रशांत मोरे (रा. मोरेवाडी, ता. करवीर) आणि ओंकार अरुण भोई (वय २४ रा.सुप्रभात कॉलनी, आपटे नगर) अशी दोघां संशयितांची नावे आहेत.
शरीर सुदृढ करण्यासाठी कळंबा मेन रोड लगेच असलेल्या एस प्रोटीन्स आणि एस फिटनेस जिम या ठिकाणी प्रशांत मोरे ही व्यक्ती 'मेफेनटेमाईन सल्फेट' नावाचे धोकादायक इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली .पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास करण्यासाठी दोन पथके स्थापन केली. पोलिसांनी औषध निरीक्षकासमवेत कळंबा येथील एस प्रोटीन्स आणि सुर्वेनगर येथील एस फिटनेस जिममध्ये छापा टाकला. 
या ठिकाणी जिमचा चालक प्रशांत मोरे याने ओंकार भोई याला कामाला ठेवले असून प्रशांत मोरे ओंकार भोईच्या मदतीने इंजेक्शन विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.पोलिसांना एस प्रोटीन्स आणि एस फिटनेस या ठिकाणी मेफेनटेमाईन सल्फेट इंजेक्शनच्या ६४ बाटल्या आणि सिरींज मिळाल्या. पोलिसांनी मोरे आणि भोई या दोघांना अटक केलेली आहे. 
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार विकास किरोळकर, संजय कुंभार, अमोल कोळेकर, प्रशांत कांबळे, सुरेश पाटील, संतोष पाटील, राजू कांबळे , विनोद कांबळे ,संजय पडवळ ,दीपक घोरपडे ,संजय कुंभार यांनी या गुन्ह्याचा तपास केला.