कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन ! रंगबहारर संस्थेसह चित्रपट व्यावसायिकही उपस्थित
schedule03 Jun 26 person by visibility 22 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या जयंती निमित्त कोल्हापुरातील रंगबहार संस्था व चित्रपट व्यावसायिक यांच्यावतीने वतीने अभिवादन करण्यात आले .
रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य गजेंद्र वाघमारे यांनी पद्माराजे उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. अध्यक्षस्थानी कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या कन्या विजयमाला मेस्त्री या होत्या. याप्रसंगी रंगबहारचे अध्यक्ष धनंजय जाधव, सचिव संजीव संकपाळ, प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे,सुधीर पेटकर, कला दिग्दर्शक सतीश बिडकर, मिलिंद अष्टेकर, आनंद काळे, नागेश हंकारे, राहुल रेपे, प्रा अभिजित कांबळे ,प्रा शैलेश राऊत, सर्वेश देवरूखकर, सुदर्शन वंडकर, विजय उपाध्ये रंगबहार आणि चित्रपट महामंडळाचे सदस्य उपस्तित होते.
याप्रसंगी कलामहर्षींच्या आठवणींचा जागर केला. चित्रपटसृष्टीतील पहिलेवहिले तंत्रज्ञान बाबूराव पेंटर यांनीच रूढ केले आहे. यामध्ये भारतीय कॅमेर्याने चित्रित केलेला पहिला चित्रपट सैरंध्री असो, याच चित्रपटासाठी स्त्री कलाकाराकडून स्त्री पात्राची भूमिका असो, चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू करण्याचा प्रभातच्या आधी महाराष्ट्र फिल्म कंपनीचा मान असो, निर्मिती, वेशभूषा, ट्रिकसीन असो, की प्रसिद्धीसाठी पोस्टरचा वापर असो, ही सारी तंत्रे पेंटरांनी पहिल्यांदाच चित्रपटासृष्टीत रूढ केली चित्रकार,शिल्पकार ,तंत्रज्ञ,चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक अश्या बहुआयामी कार्यामुळेच कलामहर्षी म्हणून ते गौरविले जात. प्रतिमा चित्रणातील कौशल्य व रंगभूमीवरील नेपथ्य. विशेषत: पडद्याची कलात्मकता या बाबतींत त्यांनी खूपच लौकिक मिळविला होता. चित्रशिल्प, आदी कलाक्षेत्नांत त्यांनी स्वाध्यायाच्या बळावरच आपली प्रगती करून घेतली होती बाबूराव पेंटर यांच्या चित्रकारितेने रसिकांना भुरळ घातली होती. असे उपस्थितानी सांगितले