Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णालंकारित तोरणाचे पूजन डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगला 25 लाखाची देणगी डी. सी. कुंभारांना तीन दिवसाची पोलिस कोठडीनीट -  सीबीएसई परीक्षतील घोटाळ्यांविरोधात काँग्रेसचा कँडल मार्चशिवराज्याभिषेक सोहळयासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे जल संकलनआठवणीतीले दवबिंदू कवितासंग्रहातून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मानसिकता लाभते– प्राचार्य जी.पी.माळीनिरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती – भरत रसाळेकोल्हापुरात गुरुवारी महाराष्ट्र धर्म याविषयी परिषदकोल्हापूर मेट्रोसिटीसाठी राजू मानेंचे धरणे आंदोलनराष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावा

जाहिरात

 

डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगला 25 लाखाची देणगी

schedule02 Jun 26 person by visibility 38 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजच्या नवीन ११ मजली इमारत बांधकामासाठी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी संस्थेचे चेअरमन डॉ. के.जी.पाटील यांच्याकडे रूपये २५ लाखाची देणगी सुपूर्त केली.

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या आणि महाराष्ट्रातील शिक्षण विश्वात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर या संस्थेची प्रमुख शाखा असलेल्या न्यू कॉलेजच्या ११ मजली आधुनिक शैक्षणिक इमारतीसाठी कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यानी २५ लाखाची देणगी दिली. नवीन इमारतीतील सेमिनार हॉलला आपले नाव असावे असा संस्थेने मनोदय व्यक्त केला. या प्रस्तावाला कुलपतींनी तत्पर स्वीकार करून संस्थेच्या प्रेमापोटी बहुमोल अशी देणगी दिली. शिवाजी विद्यापीठाचेमाजी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, प्राचार्य व्ही एम पाटील,  उदय पाटील उपस्थित होते.

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे या संस्थेकडून संस्थेचे सचिव व माजी आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी नूतन इमारत बांधकामासाठी ५ लाखांची देणगी दिली. एस.एस. कम्युनिकेशन यांचेकडून महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी ५ लाखांची देणगी दिली.कॉलेजच्या ११ मजली इमारतीचा प्रकल्प २२ कोटींचा आहे. त्यातील ७ मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच उद्घाटन करण्याचे नियोजन केले आहे. पारंपरिक शिक्षणासह अन्य काही कोर्सेस नव्याने सुरू करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे  चेअरमन के. जी. पाटील यांनी सांगितले.

या ११ मजली इमारती बांधकामासाठी समाजातील अनेक शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्ती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यावसायिक, इंजिनिअर, डॉक्टर, वकील, संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी संस्थेला देणगी देऊन कृतज्ञता व्यक्त करत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes