Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार शिवाजीराव पाटील हा घरातील मुलगा, त्यांना रागावण्याचा अधिकार - मंत्री चंद्रकांत पाटीलमाझी शाळा - माझा अभिमान, श्रमदानातून शालेय परिसराचा कायापालटजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची रविवारी सभा, संस्थेला तीन कोटी साठ लाख रुपयांचा नफाकृष्णराज महाडिकांना चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा !  सामाजिक उपक्रमांची जोड अन् कार्यकर्त्यांचा उत्साह  !!कोल्हापुरात तेरा जूनपासून एक दिवस आड पाणी पुरवठाकोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश कोकाटेशाळा प्रवेशोत्सव ठरणार प्रेरणादायी ! मंत्री - खासदार- आमदार - अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत !!कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाबद्दल सामाजिक उपक्रमपवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीस मुदतवाढ मिळावी - भरत रसाळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार - मंत्री हसन मुश्रीफ       

जाहिरात

 

महिला - बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा,  दीपा ठाणेकरांची सहपालकमंत्र्यांच्याकडे मागणी

schedule03 Jun 26 person by visibility 106 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या निर्णयानुसार महापालिकांतील महिला व बालकल्याण समितीसाठी राखीव ठेवला जाणारा निधी हा, सरकारनेच सुचविलेल्या योजनांसाठी अत्यंत तोकडा आहे. खऱ्या अर्थाने महिला व बालकांचा विकास साधण्यासाठी या राखीव निधीमध्ये वाढ करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी महापालिका महिला व बालकल्याण समिती उपसभापती दीपा ठाणेकर यांनी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे केली. यासंबंधीचे निवेदनही त्यांनी मंत्र्यांना दिले. याप्रसंगी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील आणि माजी नगरसेवक अजित ठाणेकर उपस्थित होते. महापालिकांचे मुळातच कमी असलेले उत्पन्न आणि त्यातील बांधील खर्च वजा जाता राहिलेल्या निवळ महसुलातील ५ टक्के निधी हा महिला बालकल्याण समितीसाठी अत्यल्प होतो. उदाहरणार्थ सुमारे ५०० कोटी रुपये महसूली उत्पन्न असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये महिला बालकल्याण समितीसाठी केवळ साडेपाच कोटी इतकीच तरतूद होते आहे. ही बाब लक्षात घेता योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता एकूण महसूली उत्पन्नाच्या ५ टक्के इतका निधी महिला व बालकल्याण समितीसाठी राखीव ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही आपण करावी अशी विनंती ठाणेकर यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes