महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी बिंदू चौकात अभिवादन
schedule28 Nov 26 person by visibility 5 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महात्मा जोतिबा फुले यांचा १३६ वा स्मृतीदिन राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे बिंदू चौक येथील महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंचचे सहनिमंत्रक बबनराव रानगे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांचा पुरोगामी वारसा जपायचा असेल तर फुले शाहू आंबेडकर विचारधारा कृतीत आणली पाहिजे. असे आवाहन केले. यावेळी महेश जाधव, सदानंद दिगे, राजेश वरक यांनी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी पत्रकार गुरुबाळ माळी, कादर मलबारी, प्रकाश पाटील, दत्तात्रय वारके, सुभाष वाणी, दिगंबर लोहार, अशोक माळी, महेश मछले, जयेश ओसवाल, आनंद माळुंगेकर, दत्ता बोडके, रामचंद्र रेवडे, सुरेश कांबळे, भिकाजी कांबळे, बाळासो मोमीन, राहुल माळी, आनंद दफडे, राजू मालेकर, राजू बाणदार, विजय जाधव उपस्थित होते