Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खालील डडसी - टीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र देण्याची मागणी मान्य :राज्याध्यक्ष भरत रसाळेविकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान -कौशल्यांचा उपयोग करावा : राज्यपाल जिष्णू देव वर्माकोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएचडीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सरदार दिंडे, व्हाईस चेअरमनपदी सोनाली गुरवसंविधान दिनानिमित्त सांगलीत ग्रंथ प्रदर्शन, दहा डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुलेओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी, डॉ. व्यंकट गीते शुक्रवारी कोल्हापुरातसिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरने घेतले अंबाबाई देवीचे दर्शनशासन नियुक्त संचालक प्रकरण, पुढील सुनावणी तीन डिसेंबरडॉ. विजयकुमार माने यांचे निधन

जाहिरात

 

सी - टीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र देण्याची मागणी मान्य :राज्याध्यक्ष भरत रसाळे

schedule27 Nov 26 person by visibility 17 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सी -टीईटी (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ) घेण्यात येते . २०२६ मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली यांच्याकडे केली होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीटीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र मान्य केले. बारा डिसेंबर २०२६ पासून म होणाऱ्या सी .टीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांनी दिलेली आहे. या परीक्षा केंद्रामुळे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी जिल्ह्यातील परीक्षांर्थीना प्रवा , निवास व्यवस्थेच्या कटकटीतून मुक्त होऊन सोयीच्या ठिकाणी परीक्षा देण्यांसाठी दिलासा मिळाला असे रसाळे यांनी म्हटले आहे.
 सीटीईटी परीक्षेसाठी या पूर्वी महाराष्ट्रात फक्त मुंबई , संभाजी नगर, अमरावती नागपूर या ठिकाणीच केंद्रे होती. गेल्या वेळी कोल्हापुर जिल्हा व परिसरांतील सेवेतील शिक्षक व नवीन विद्यार्थी अशा सुमारे चाळीस हजार परीक्षार्थीना  मुंबई केंद्र मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या निवासाची, प्रवासाची व केंद्र ठिकाण शोधण्यांसाठी खूप त्रास झाला होता  त्यामुळे आमच्या महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्यावतीने तीन जून रोजी केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ नवी दिल्ली येथील सीटीईटी परीक्षा विभागाच्या संचालकांना निवेदन दिले. पश्चिम महाराष्ट्रासाठी एकही केंद्र नसल्याने कोल्हापूर सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी सीटीईटी परीक्षेसाठी सोयीचे ठिकाण म्हणून कोल्हापूर केंद्र द्यावे अशी मागणी केलेली होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीटीईटी परीक्षा विभागाने सहानुभूतीपूर्वक विचार करून कोल्हापूर केंद्रास मान्यता दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes