Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संवादातून समन्वय, समन्वयातून सहकार्य आणि सहकार्यातून परिवर्तन! कुलगुरू व्यंकट गीतेंचा विद्यार्थ्यांशी संवादसी - टीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र देण्याची मागणी मान्य :राज्याध्यक्ष भरत रसाळेविकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान -कौशल्यांचा उपयोग करावा : राज्यपाल जिष्णू देव वर्माकोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएचडीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सरदार दिंडे, व्हाईस चेअरमनपदी सोनाली गुरवसंविधान दिनानिमित्त सांगलीत ग्रंथ प्रदर्शन, दहा डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुलेओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी, डॉ. व्यंकट गीते शुक्रवारी कोल्हापुरातसिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरने घेतले अंबाबाई देवीचे दर्शनशासन नियुक्त संचालक प्रकरण, पुढील सुनावणी तीन डिसेंबरडॉ. विजयकुमार माने यांचे निधन

जाहिरात

 

संवादातून समन्वय, समन्वयातून सहकार्य आणि सहकार्यातून परिवर्तन! कुलगुरू व्यंकट गीतेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

schedule27 Nov 26 person by visibility 6 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: ‘ प्रत्येक महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता, संशोधन आणि विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धती राबवावी. गुणवत्तावाढीच्या प्रयत्नांना सक्रिय सहकार्य करावे. संवादातून समन्वय, समन्वयातून सहकार्य आणि सहकार्यातून परिवर्तन निश्चित आहे. त्याद्वारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता व प्रतिष्ठा अधिक उंचावण्यासाठी एकत्रित काम करु या.’अशा शब्दांत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते यांनी विद्यार्थ्याना आश्वस्त केले.

निमित्त  होतं,नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे  कुलगुरू  डॉ. व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांनी शुक्रवारी (२७ नोव्हेंबर २०२६) कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाला सदिच्छा भेटीचे. त्यांनी, वैद्यकीय विद्यार्थी, अध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. विद्यापीठाच्या 'ओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी या विशेष उपक्रमांतर्गत शेंडा पार्क येथील महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम झाला. या संवाद सत्रादरम्यान कुलगुरू गीते यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय, परीक्षा, निकाल, अभ्यासक्रम व आंतरवासिता यांसंदर्भातील विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्यात, कोल्हापूर विभागीय केंद्राच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने अधिष्ठाता, प्राचार्य आणि समन्वयकांना मार्गदर्शन करताना कुलगुरू गीते यांनी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमधील कार्यपद्धती अधिक गतिमान करण्यावर भर दिला.

‘विभागीय केंद्र हे केवळ विद्यापीठाचे प्रशासकीय कार्यालय न राहता, ते विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा असले पाहिजे. महाविद्यालयांना आवश्यक प्रशासकीय सुविधा व मार्गदर्शन स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देणे हे विभागीय केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असावे. विद्यापीठाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे, शैक्षणिक गुणवत्ता टिकवणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही सर्व अधिष्ठाता, प्राचार्य आणि समन्वयकांची सामूहिक जबाबदारी आहे.’असे त्यांनी स्पश्ठ केले.

कार्यक्रमास राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू (ऑनलाईन) उपकुलसचिव प्रकाश पाटील, उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, सिनेट सदस्य तथा या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. बी. वाय. माळी, सहाय्यक कुलसचिव संदीप राठोड (ऑनलाईन), विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. देवेंद्र पाटील, कोल्हापूर विभागीय केंद्र समन्वयक डॉ. राजकुमार पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes