Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएचडीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सरदार दिंडे, व्हाईस चेअरमनपदी सोनाली गुरवसंविधान दिनानिमित्त सांगलीत ग्रंथ प्रदर्शन, दहा डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुलेओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी, डॉ. व्यंकट गीते शुक्रवारी कोल्हापुरातसिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरने घेतले अंबाबाई देवीचे दर्शनशासन नियुक्त संचालक प्रकरण, पुढील सुनावणी तीन डिसेंबरडॉ. विजयकुमार माने यांचे निधनशहीद जवान सिताराम पाटील यांच्या स्मृतींना उजाळा, तिटवे येथे शहीद सन्मान दिन साजराजिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनस्वयंप्रेरिकेचा ३२ वा वर्धापनदिन उत्साहात

जाहिरात

 

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सरदार दिंडे, व्हाईस चेअरमनपदी सोनाली गुरव

schedule26 Nov 26 person by visibility 13 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सरदार शंकर दिंडे व व्हाईस चेअरमनपदी सोनाली दत्तात्रय गुरव यांची निवड करण्यात आली.जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधीक्षक उदय सालपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी निवडी झाल्या. चेअरमनपदासाठी दिंडे यांच्या नावाला मावळते चेअरमन जितेंद्र वसगडेकर हे सूचक तर संचालक रणजित पाटील यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी श्रीमती गुरव यांच्या नावाला मावळते व्हाईस  चेअरमन जयकुमार रेळेकर हे सूचक तर संचालक नंदीप मोरे यांनी अनुमोदन दिले. ’जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची सोसायटी ही मातृसंस्था आहे.कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य व कौटुंबीक उत्कर्षात सोसायटीचे योगदान मोठे आहे. या संस्थेचे पदाधिकारी म्हणून काम करताना सभासदांच्या हिताचा कारभार करू’अशी ग्वाही चेअरमन दिंडे व व्हाईस  चेअरमन गुरव यांनी दिली. या निवडीप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, एम. एम. पाटील, के. आर. किरुळकर, राजाराम वरुटे, राजीव परीट, रवीकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट, कपिल पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes