Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अगोदर फॉर्म्युला निश्चित करा, मगच नियोजन समितीतील विकासकामांच्या आराखडयांना मंजुरी : स्थायी समितीचा आक्रमक पवित्रासंवादातून समन्वय, समन्वयातून सहकार्य आणि सहकार्यातून परिवर्तन! कुलगुरू व्यंकट गीतेंचा विद्यार्थ्यांशी संवादसी - टीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र देण्याची मागणी मान्य :राज्याध्यक्ष भरत रसाळेविकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान -कौशल्यांचा उपयोग करावा : राज्यपाल जिष्णू देव वर्माकोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएचडीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सरदार दिंडे, व्हाईस चेअरमनपदी सोनाली गुरवसंविधान दिनानिमित्त सांगलीत ग्रंथ प्रदर्शन, दहा डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुलेओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी, डॉ. व्यंकट गीते शुक्रवारी कोल्हापुरातसिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरने घेतले अंबाबाई देवीचे दर्शनशासन नियुक्त संचालक प्रकरण, पुढील सुनावणी तीन डिसेंबर

जाहिरात

 

अगोदर फॉर्म्युला निश्चित करा, मगच नियोजन समितीतील विकासकामांच्या आराखडयांना मंजुरी : स्थायी समितीचा आक्रमक पवित्रा

schedule27 Nov 26 person by visibility 38 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या विकासनिधी वाटपाच्या फॉर्म्युलावरुन जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थायी समितीची, शुक्रवारी (२७ नोव्हेंबर २०२६) सभा झाली. या सभेत सर्वच पक्षाच्या सदस्यांनी, ‘जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा आधी फॉर्म्युला निश्चित होऊ दे, मगच विकासकामांच्या आराखडयांना मंजुरी’असा आक्रमक पवित्रा घेत हा विषय बाजूला सारला. दरम्यान शुक्रवारच्या बैठकीत करवीर पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी तीन जागा निश्चित करण्याच्या सुचविल्या आहेत. याशिवाय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा व्यवस्थापनसंबंधी सविस्तर चर्चा झाली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा झाली. उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील, समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा अविनाश गायकवाड, सदस्य अमरसिंह पाटील, संग्रामसिंह कुपेकर, अभिजीत तायशेटे, सुधीर देसाई, शिवाजी जाधव, जयंत पाटील, महेश पाटील यांनी विविध विषयावरील चर्चेत सहभाग घेतला.

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा विषय सध्या ऐरणीवर आहे. जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीचे वितरण करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषद सदस्यांना हवा अशी भूमिका सदस्यांची आहे.  आमदार व खासदारांना सत्तर टक्के आणि सदस्यांना तीस टक्के असा फॉर्म्युला चर्चेत आहे. निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या सदस्यांनी नुकतेच जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील महायुतीचे आमदार व महायुतीच्या सदस्यांची बैठक घेत निधी संबंधी चर्चा केली. राज्यात सगळीकडे ७०:३० चा फॉर्म्युला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सदस्यांना सन्मानजनक निधी देऊ असे मंत्री महोदयांनी त्या बैठकीत सांगितले होते. तसेच फॉर्म्युलाही कळविला जाईल असे स्पष्ट केले होते.

शुक्रवारी, स्थायी समितीची बैठक होत असतानाही निधी वाटपाचा फॉर्म्युला काही जाहीर झाला नव्हता. जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधी वाटपावरुन स्थायी समिती सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत, ‘जोपर्यंत फॉर्म्युला निश्चित होत नाही, तोपर्यंत विकास आराखडयांना मंजुरी नको.’असे म्हणत या विषय प्रलंबित ठेवला. करवीर पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी कदमवाडी येथील जागा, नागाळा पार्क परिसरातील विवेकानंद कॉलेजच्या पिछाडीची जागा तसेच मार्केट यार्ड लगतची जागा असे तीन पर्याय सुचविले आहेत. करवीर पंचायत समितीच्या सदस्यांनी त्या जागांची पाहणी करुन एक जागा निश्चित करावी असा पर्यायही दिला.

बदलीमध्ये अनियमितता, घोळ सदस्यांनी वेधले लक्ष

‘जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीमध्ये अनियमितता व घोळ झाला आहे. आरोग्य  विभागातील कामकाजाविषयी तक्रारी आहेत. विभागांनी कामकाजात सुधारणा करायला हवी. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना कराव्यात.’ अशा शब्दांत सदस्यांनी भावना व्यक्त केल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes