Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज डडजज डददजज डडडीवाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक संशोधकामध्ये समावेशमहायुतीचा फॉर्म्युला ठरला, आता उमेदवारांची निश्चिती ! सारेच इच्छुक प्रचारात, उमेदवार निवडताना नेत्यांची कसोटी !!गांधीनगर व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी अशोक टेहल्यानीसुटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी प्रा. सयाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी प्रा. शरद गायकवाड , दत्तात्रय पाटीलस्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंना भाजपकडून एबी फॉर्म, सोमवारी अर्ज भरणार!! शरद लाड, विजयसिंह मानेंची माघार अन भाजपला पाठिंबा जाहीर!!पुणे पदवीधर - शिक्षक भाजपकडे ! स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंची उमेदवारी घोषित !!मुश्रीफांनी सत्ताधर्म पाळला ! अश्वमेधचा घोडा अर्ध्यावर !!

जाहिरात

 

डीवाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक संशोधकामध्ये समावेश

schedule05 Oct 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शैक्षणिक संशोधन निर्देशांकातर्फे  जाहीर करण्यात आलेल्या २०२६ च्या जागतिक 'टॉप १००० संशोधक' क्रमवारीत डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील तीन प्राध्यापकांनी स्थान मिळवले आहे.  या यादीत प्रा. (डॉ.) विनायक पारळे यानी ४९ वे स्थान मिळवले असून डॉ. शिवानंद एस. शिरकोले यानी १९५ वे तर डॉ. उमेश व्ही. शेंबडे यांनी ५०९ वे स्थान प्राप्त केले आहे. 

प्रा.  पारळे यांचे जपानमध्ये प्रथम स्थान विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) विनायक जी. पारळे यांनी “एरोजेल्स आणि उष्णतारोधन तंत्रज्ञान” या अत्यंत महत्त्वाच्या संशोधन विषयात २०२१-२०२५ या प्रभाव कालावधीसाठी जागतिक क्रमवारीत ४९ वे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, जागतिक टॉप १००० मध्ये या विषयात त्यांनी जपानमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९५.१० असून ते जगातील सर्वोच्च १.१ टक्के वैज्ञानिकांमध्ये समाविष्ट आहेत. या विद्यापीठात रुजू होण्यापूर्वी त्यांनी जपानच्या हिरोशिमा विद्यापीठात आणि दक्षिण कोरियाच्या यॉन्सेई विद्यापीठात महत्त्वपूर्ण संशोधन कार्य केले असून, त्यांचा यापूर्वी स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून जाहीर होणाऱ्या जगातील सर्वोच्च २ टक्के वैज्ञानिकांच्या यादीतही समावेश झाला होता.

विद्यापीठाचे अधिष्ठाता  शिरकोले यांनी “अन्न गोठवण व स्फटिकीकरण प्रक्रिया” या संशोधन विषयात २०२१-२०२५ या कालावधीसाठी जागतिक स्तरावर १९५ वे स्थान मिळवले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ७७.९० असून ते जगातील ११.१ टक्के सर्वोच्च वैज्ञानिकांमध्ये आहेत.

प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग सहाय्यक प्रा. शेंबडे यांनी “संक्रमण धातूंचे ऑक्साइड नॅनोपदार्थ” या विषयात जागतिक स्तरावर ५०९ वे स्थान, तर भारतामध्ये ७८ वे स्थान प्राप्त केले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८८.८२ असून ते जगातील ४.३ टक्के सर्वोच्च वैज्ञानिकांमध्ये गणले जातात. विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार एस. गुप्ता आणि कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र ए. खोत  यांनी या तिन्ही संशोधकांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes