+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Feb 24 person by visibility 175 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहा तपास पथकांच्या माध्यमातून गुजरीत भर दुपारी झालेल्या धाडसी चोरीचा यशस्वी तपास केला. पोलिसांनी तीन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून२४४ ग्रॅम सोने, रोख ६९ हजार रुपये असा सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची माहिती दिली. २५ जानेवारी रोजी वर्दळीच्या भाऊसिंगजी रोडवर दुपारी दीडच्या सुमारास सिमंदर ज्वेलर्स ही सराफी पेढी फोडून चोरट्यांनी २५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,रोख रक्कम लंपास केली होती. या चोरीने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिले. पोलिसांनी सहा पदके स्थापन करून परिसरातील सीसीटीव्ही, कारागिरांची माहिती, मोबाईल लोकेशन , परराज्यातून गुजरीमध्ये काम करणारे कारागीर, ट्रॅव्हल्स व अन्य वाहने यांचा तपास केला. गुजरीमध्ये राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील कारागीर मोठ्या प्रमाणात काम करतात. पोलिसांनी राजस्थानमध्ये ही एक पथक तपासासाठी पाठवले होते.
 दरम्यान राजस्थान येथील सिरोही येथील कारागिरांनी चोरी केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. पिंटू जयसिंग राठोड (वय २९ रा.नून, सिरोही , राजस्थान) येथील कारागिराने चोरी केल्याची माहिती मिळाली आणि त्याचे सहकारी पुणे बेंगलोर मार्गावरील हॉटेल नीलकमल येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या परिसरात सापळा रचना पिंटू राठोड त्याचा सहकारी पुनम सिंग अनुसिंग देवरा (वय २१ रा. नून), केवलकुमार गणेशराज परमार ( रा.नून, सध्या राहणार उत्तरेश्वर प्लाझा, उत्तरेश्वर पेठ) या तिघांना ताब्यात घेतले .त्यांच्याकडून २२४ ग्रॅम वजनाचे दागिने, रोख ६४ रुपये हस्तगत केले. या गुन्ह्यातील तिसरा संशय केवलकुमार परमार हा उत्तरेश्वर प्लाझा येथे राहत असून त्याने सिमंदर ज्वेलर्स पिढीच्या डुप्लिकेट चाव्या तयार केल्या होत्या.
 डुप्लिकेट चावीने कुलपे उघडून त्यांनी चोरी केली होती याची कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, संजय कुंभार ,प्रकाश पाटील, अमित सर्जे, सतीश जंगम, समीर कांबळे, राम कोळी, अनिल जाधव ,सुशील पाटील, अशोक पवार, संजय पडवळ, राजेंद्र वरदेकर ,राजू कांबळे, हिंदुराव केसरे ,रफिक आवळकर, अमर आडुरकर, विनोद चौगुले या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.