दुनिया दौलत-ताकत से नही, मोहब्बत से चलती है - दत्तोपंत वालावलकरांचा कार्यकर्त्यांसह समरजितसिंह घाटगेंना पाठिंबा
schedule09 Nov 24 person by visibility 52 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की मला पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. लोकशाहीत एवढी मस्ती बरी नाही. आमचा मुश्रीफांच्या प्रवृत्तीला विरोध आहे असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी केले. वालावलकर यांच्यासह 25 गावातील कार्यकर्त्यांनी राजे समरजितसिंह घाटगे यांना या निवडणुकीत पाठिंबा दिला.
दत्तोपंत वालावलकर म्हणाले साके येथील एका कार्यक्रमात संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाबद्दल दुसऱ्या दिवशी त्यांना भेटून त्यांनी घेतलेल्या निर्णयास आमचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. दौलत से नही,ताकत से नही, मोहब्बत से दुनिया चलती है. याप्रमाणे 25 गावातील कार्यकर्त्यांना भेटून भूमिका सांगितली. मुश्रीफांसारख्या प्रवृत्तीसोबत जाण्याचे विचार पटले नाहीत. म्हणून आम्ही समरजितसिंह घाटगे पाठिंबा दिला.
महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे म्हणाले, " मुश्रीफ हे कधीच पुरोगामी नव्हते. त्यांनी पुरोगामीचा बुरखा पांगरला होता. कागल, गडहिंग्लज, उत्तुर मतदारच त्यांना पाडायला जन्माला आले आहेत."
उमेश देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे शिवानंद माळी संभाजी भोकरे महेश मोरे महेश देशपांडे कृष्णात पाटील संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तुकाराम भारमल यांनी आभार मानले.
....................
कागल पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर, महेश देशपांडे, मोहन मोरे, राजाराम बोळके, रामराव घोरपडे, बाबुराव भारमल, इस्माईल मुजावर, श्रीकांत लुगडे, भारत पाटील, सतीश गुरव खंडू चांडवले, एम.डी. चांडवले, सतीश गुरव, बाळासाहेब निचळ, अशोक पाटील, टी. एस. गडकरी, श्रीनिवास देशपांडे, आनंदा दिवटे, सचिन पडवळे, भीमराव ढोले, चंद्रकांत सांगले, मिलिंद देशपांडे, कृष्णात सव्वाशे, अभिजीत पोतदार, बाळासाहेब तेलवेकर, सागर माळी, पांडुरंग मोहिते, बाळासाहेब परीट, दत्तात्रय कुमठेकर यांनी पाठिंबा दिला.